Join us  

Jasprit Bumrah, Ind vs Eng Live test Match : OMG! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, इंग्लंडच्या फलंदाजाला कळण्याआधीच उडाल्या बेल्स; 'SENA' देशांत नोंदवला विक्रम, Video 

Ind Vs Eng test Match live : नवा चेंडू हातात येताच जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) धडाधड दोन विकेट्स घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 8:41 PM

Open in App

Ind Vs Eng test Match live : भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॅवली व अॅलेक्स लीज यांनी उल्लेखनीय सुरुवात केली. पण, नवा चेंडू हातात येताच जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) धडाधड दोन विकेट्स घेतल्या. सलामीवीर क्रॅवली याने बुमराहने टाकलेला भन्नाट चेंडू सोडण्याची चूक केली आणि त्याला काही कळण्याआधीच त्याचा त्रिफळा उडाला... त्यानंतर ऑली पोपलाही ( ०) बाद करून इंग्लंडला १०७ धावांवर दोन धक्के दिले. 

इंग्लंडच्या ओपनर्सची शतकी भागीदारी; निराश होऊ नका चौथ्या कसोटीचा रिझल्ट आठवा  

टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ २८४ धावांत तंबूत परतला. चेतेश्वर पुजारा १६८ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीने ६६ धावांवर माघारी परतला, तर रिषभ पंतनेही ८६ चेंडूंत ५७ धावा केल्या.  भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर आटोपला अन् इंग्लंडसमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवले गेले.  एडबस्टन येथे २००८मध्ये दक्षिण आफ्रिकेने २८३ धावांचे लक्ष्य पार केले होते आणि ही येथील सर्वोत्तम कामगिरी आहे. इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॅवली व अॅलेक्स लीज यांनी उल्लेखनीय सुरुवात केली.

इंग्लंडच्या ओपनर्सनी २० षटकांत शतकी भागीदारी पूर्ण केली आहे. लीजने कसोटीतील दुसरे अर्धशतक पूर्ण करताना ७-८च्या सरासरीने इंग्लंडच्या धावांचा वेग कायम राखला.  नवा चेंडू हाती येताच जसप्रीत बुमराह पुन्हा गोलंदाजीला आला अन् त्याने क्रॅवलीचा त्रिफळा उडवला, इंग्लंडला १०७ धावांवर पहिला धक्का बसला. टी ब्रेकनंतर बुमराहने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना ओली पोपला माघारी पाठवले. 

क्रॅवलीच्या विकेटसह बुमराहने SENA देशांत ( South Africa, England, New Zealand & Australia) १०० कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. त्याने इंग्लंडमध्ये ( ३७), ऑस्ट्रेलियात ( ३२), दक्षिण आफ्रिकेत ( २६) व न्यूझीलंडमध्ये ( ६) विकेट्स घेतल्या आहेत. असा पराक्रम करणारा तो सहावा भारतीय गोलंदाज आहे. अनिल कुंबळे ( १४१), इशान शर्मा ( १३०) , जहीर खान ( ११९), मोहम्मद शमी ( ११९), कपिल देव ( ११७) यांनी हा पराक्रम केला आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराहकपिल देवअनिल कुंबळे
Open in App