India vs England Test Match Live : जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली टीम इंडिया पाचव्या कसोटीत इंग्लंडचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने मागील वर्षी भारत-इंग्लंड मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती आणि त्या मालिकेतील अखेरचा सामना आजपासून सुरू झाला. ३५ वर्षांनंतर भारताचा जलदगती गोलंदाज इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात नेतृत्वाची जबाबदारी पार पाडणार आहे. पण, नाणेफेकीनंतर जेव्हा हाच मुद्दा इंग्लंडचा माजी खेळाडू मार्क बूचर ( Mark Butcher) याला त्याची चूक दाखवली.
एडबस्टन येथे भारताची कामगिरी फार चांगली झालेली नाही, परंतु बुमराह अँड टीम इतिहास घडवण्यासाठी सज्ज आहे.. १५ वर्षापूर्वी भारताने जेव्हा इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती, तेव्हा राहुल द्रविड त्या संघाचा कर्णधार होता आणि आज तो मुख्य प्रशिक्षक आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ओपनिंगला शुबमन गिलसोबत कोण असेल याची उत्सुकता होती. चेतेश्वर पुजारा सलामीला खेळत आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
जसप्रीत बुमराह व मार्क बुचर यांच्यातील संवाद...
- मार्क बुचर - अभिनंदन... आता आपल्यासमोर जलदगती गोलंदाज कर्णधार म्हणून समोर उभा आहे, परंतु भारताकडून जलदगती गोलंदाज कर्णधार यापूर्वी कधी झाला नाही.
- जसप्रीत बुमराह - हे पहिल्यांदा होत नाही... कपिल देव हे आमचे कर्णधार होते
- मार्क बुचर- अष्टपैलू खेळाडू
- जसप्रीत बुमराह - ठिक आहे, अष्टपैलू तुम्ही म्हणाताय तर
कपिल देव यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ४३४ विकेट्स व ५२४८ धावा आहेत. १९८३ साली त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला.