Ind Vs Eng test Match live : ५ बाद ८४ धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या इंग्लंडने दमदार फटकेबाजी केली. जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स यांनी सहाव्या विकेटसाठी ७५ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला दोन जीवदान मिळाले. शार्दूल ठाकूर व जसप्रीत बुमराह यांनी सोपे झेल सोडले. बेअरस्टो व स्टोक्स ही जोडी तोडण्यासाठी लॉर्ड शार्दूल ठाकूरला ( Shardul Thakur) गोलंदाजीला आणले आणि त्याने पहिल्याच षटकात कमाल केली. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्टोक्सने मारलेला फटका मिड ऑफला उभ्या असलेल्या बुमराहच्या हाती सहज विसावणारा होता, परंतु भारताच्या कर्णधाराने तो झेल सोडला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर एक पाऊल पुढे येऊन स्टोक्सने मिड ऑफच्या दिशेने जोरदार फटका मारला. सोपा झेल सोडणारा बुमराह ही कॅच काही घेत नाही असेच वाटत होते, परंतु बुमराहने हवेत उडी मारली अन् अशक्यप्राय वाटणारा झेल घेतला.
टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा निम्मा संघ ८४ धावांवर माघारी परतला होता. अॅलेक्स लीज ( ६), झॅक क्रॅवली ( ९) व ऑली पोप ( १०) यांना बुमराहने बाद केले. त्यानंतर मोहम्मद सिराजने महत्त्वाची विकेट घेताना जो रूटला ६७ चेंडूंत ३१ धावांवर बाद केले. मोहम्मद शमीने नाईट वॉचमन जॅक लिचला ( ०) माघारी पाठवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा स्टोक्स व बेअरस्टो यांनी आक्रमक सुरूवात केली.
१८ धावांवर असताना स्टोक्सचा उत्तुंग उडालेला झेल शार्दूल ठाकूरने टाकला. दरम्यान, विराट व बेअरस्टो यांच्यात वाद रंगला. बेअरस्टोने ८१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. शार्दूलच्या गोलंदाजीवर स्टोक्सला २५ धावांवर आणखी एक जीवदान मिळाले. कर्णधार बुमराहने सोपा झेल टाकला. पण, पुढच्याच चेंडूवर तोच फटका मारण्याचा स्टोक्सकडून प्रयत्न झाला, परंतु यावेळी अशक्य वाटणारा झेल बुमराहने टिपला अन् इंग्लंडला मोठा धक्का दिला.
Web Title: Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Jasprit Bumrah takes a magnificent catch after dropping it in the previous ball, England captain Ben Stokes departs. Shardul strikes, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.