Ind vs Eng Live test Match : भारतीय गोलंदाजांचा दिशाहीन मारा; जो रूट व जॉनी बेअरस्टो जोडीने वाजवले तीन तेरा!, पाहा Day 4 Highlights 

भारताच्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जॅक क्रॅवली ( ४६) व अॅलेक्स लीज ( ५६)  यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या अन् मजबूत पाया रचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 03:28 PM2022-07-05T15:28:01+5:302022-07-05T15:28:15+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Joe Root and Jonny Bairstow magical innings, Watch day 4 highlights, Video  | Ind vs Eng Live test Match : भारतीय गोलंदाजांचा दिशाहीन मारा; जो रूट व जॉनी बेअरस्टो जोडीने वाजवले तीन तेरा!, पाहा Day 4 Highlights 

Ind vs Eng Live test Match : भारतीय गोलंदाजांचा दिशाहीन मारा; जो रूट व जॉनी बेअरस्टो जोडीने वाजवले तीन तेरा!, पाहा Day 4 Highlights 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng test Match live : जो रूट आणि जॉनी बेअरस्टो या अनुभवी व फॉर्मात असलेल्या जोडीने भारताच्या हातून सामना खेचून नेला आहे. पाचव्या दिवशी ११९ धावा डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरलेल्या जोडीने आक्रमक सुरुवात केली. सेट झालेले हे दोन्ही फलंदाज सहजतेने धावा करत होते. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रातही भारतीय गोलंदाजांकडून काही खास स्ट्रॅटेजी आखलेली दिसली नाही आणि त्यामुळे सामना हातातून निसटताना दिसतोय... इंग्लंडच्या ३ बाद २८८ धावा झाल्या असून आता केवळ त्यांना ९० धावा करायच्या आहेत. 

इंग्लंडचे फलंदाज गोंधळले, आयती विकेट देऊन बसले; विराट कोहलीचा जल्लोष पाहून सारे हसले

भारताच्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जॅक क्रॅवली ( ४६) व अॅलेक्स लीज ( ५६)  यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या अन् मजबूत पाया रचला. त्यानंतर भारताने २ धावांच्या अंतराने तीन विकेट्स घेत कमबॅक केले. इथून भारताला सामन्यावर पकड मजबूत करण्याची संधी होती, परंतु बेअरस्टोला १४ धावांवर दिलेले जीवदान महागात पडले. बेअरस्टो व रूट या अनुभवी खेळाडूंनी चौथ्या दिवसाचे अखेरचे संपूर्ण सत्र खेळून काढताना ३ बाद १०९ वरून इंग्लंडला सावरले.


भारताच्या पहिल्या डावातील ४१६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला. मोहम्मद सिराजने चार विकेट्स घेतल्या. १३२ धावांची आघाडी मिळवूनही भारताला दुसऱ्या डावात साजेशी कामगिरी करता आली नाही. चेतेश्वर पुजारा ( ६६) व रिषभ पंत ( ५७) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने २४५ धावांपर्यंत मजल मारली आणि इंग्लंडसमोर ३७८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात ते यशस्वी झाले. एडबस्टन कसोटीत आतापर्यंत २८४ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आला आहे. पण, इंग्लंडची सद्यस्थिती पाहता हा विक्रम मोडला जाण्याची चिन्हे आहेत.  रूटने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक २४३२* धावा करणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडूचा  मान पटकावताना अॅलिस्टर कूकला ( २४३१) मागे टाकले. रूट व बेअरस्टो यांची विकेट मिळवण्यासाठी भारताने दोन DRS ही वाया घालवले. 

Web Title: Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Joe Root and Jonny Bairstow magical innings, Watch day 4 highlights, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.