Ind Vs Eng test Match live : जो रूट आणि जॉनी बेअरस्टो या अनुभवी व फॉर्मात असलेल्या जोडीने भारताच्या हातून सामना खेचून नेला आहे. पाचव्या दिवशी ११९ धावा डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरलेल्या जोडीने आक्रमक सुरुवात केली. सेट झालेले हे दोन्ही फलंदाज सहजतेने धावा करत होते. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रातही भारतीय गोलंदाजांकडून काही खास स्ट्रॅटेजी आखलेली दिसली नाही आणि त्यामुळे सामना हातातून निसटताना दिसतोय... इंग्लंडच्या ३ बाद २८८ धावा झाल्या असून आता केवळ त्यांना ९० धावा करायच्या आहेत.
इंग्लंडचे फलंदाज गोंधळले, आयती विकेट देऊन बसले; विराट कोहलीचा जल्लोष पाहून सारे हसले
भारताच्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जॅक क्रॅवली ( ४६) व अॅलेक्स लीज ( ५६) यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या अन् मजबूत पाया रचला. त्यानंतर भारताने २ धावांच्या अंतराने तीन विकेट्स घेत कमबॅक केले. इथून भारताला सामन्यावर पकड मजबूत करण्याची संधी होती, परंतु बेअरस्टोला १४ धावांवर दिलेले जीवदान महागात पडले. बेअरस्टो व रूट या अनुभवी खेळाडूंनी चौथ्या दिवसाचे अखेरचे संपूर्ण सत्र खेळून काढताना ३ बाद १०९ वरून इंग्लंडला सावरले.