Ind Vs Eng test Match live : एडबस्टन कसोटीत २०१८मध्ये शतकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीकडून ( Virat Kohli) फार अपेक्षा होती. विराट त्याच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाचा दुष्काळ दोन-अडीच वर्षानंतर येथेच संपवेल असे सर्वांना वाटले होते. पण, विराटचा खराब फॉर्म इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत कायम राहिला. पहिल्या डावात ११ धावांवर माघारी परतलेल्या विराटला दुसऱ्या डावात २० धावाच करता आल्या. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने भारताला हा मोठा धक्का दिला. यष्टिरक्षकाच्या हातून सुटलेला झेल जो रूटने एका हाताने पकडला.
टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा निम्मा संघ ८४ धावांवर माघारी परतला होता. तिसऱ्या दिवशी जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स यांनी सहाव्या विकेटसाठी ७५ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी केली. स्टोक्स २५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर बेअरस्टो व सॅम बिलिंग्स यांनी ४९ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. बेअरस्टो १४० चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०६ धावांवर बाद झाला. इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला. भारताने पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतली. भारताच्या पहिल्या डावातील ४१६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला. मोहम्मद सिराज ( ४-६६), जसप्रीत बुमराह ( ३-६८), मोहम्मद शमी ( २-७८) व शार्दूल ठाकूर ( १-४८) या जलदगती गोलंदाजांनी भारताला आघाडी मिळवून दिली.
भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात फार चांगली झाली नाही. शुबमन गिल ( ४) जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर हनुमा विहारी व चेतेश्वर पुजारी यांनी ३९ धावांची भागीदारी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. विहारीला ( ११) स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले. विराट कोहली येताच प्रेक्षकांनी जल्लोष केला, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने अँडरसनला सुरेख कव्हर ड्राईव्ह मारले, परंतु स्टोक्सने त्याला बाद केले. विराट २० धावांवर बाद झाला तेव्हा भारताच्या ३ बाद ७५ धावा झालेल्या आणि भारताने २०९ धावांपर्यंत आघाडी घेतली होती.
Web Title: Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Missed by the Wicketkeeper, but Joe Root holds onto that one with one hand, Virat Kohli departs for 20 Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.