Rishabh Pant, IND vs ENG Live 5th Test Match : रिषभ पंतचा वर्ल्ड रेकॉर्ड, १४५ वर्षांत इंग्लंडमध्ये प्रथमच झाला हा कारनामा; Rahul Dravidची भारी रिअ‍ॅक्शन, Video

India vs England Test Match Live : रिषभ पंत ( Rishabh Pant) हे वेगळंच समीकरण आहे. क्रिकेटचा कोणताही प्रकार असो, त्याची शैली तिच..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 10:35 PM2022-07-01T22:35:57+5:302022-07-01T22:36:21+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th Test Match Live Scorecard :  Rahul Dravid'c reaction on Rishabh Pants century tell you how important this century was for the team, Video | Rishabh Pant, IND vs ENG Live 5th Test Match : रिषभ पंतचा वर्ल्ड रेकॉर्ड, १४५ वर्षांत इंग्लंडमध्ये प्रथमच झाला हा कारनामा; Rahul Dravidची भारी रिअ‍ॅक्शन, Video

Rishabh Pant, IND vs ENG Live 5th Test Match : रिषभ पंतचा वर्ल्ड रेकॉर्ड, १४५ वर्षांत इंग्लंडमध्ये प्रथमच झाला हा कारनामा; Rahul Dravidची भारी रिअ‍ॅक्शन, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England Test Match Live : रिषभ पंत ( Rishabh Pant) हे वेगळंच समीकरण आहे. क्रिकेटचा कोणताही प्रकार असो, त्याची शैली तिच.. जेम्स अँडरसनसारख्या अनुभवी गोलंदाजाला रिव्हर्स फटका मारण्याचे धाडस रिषभच करू शकतो, स्टुअर्ट ब्रॉड, मॅथ्यू पॉट्स यांना तर त्याने सहज चोपले. फिरकीपटू जॅक लिच याला रिषभने बळीचा बकरा बनवले... ५ बाद ९८ अशा अवस्थेत सापडलेल्या टीम इंडियाला रिषभने संजीवनी दिली. आक्रमणाला आक्रमणानेच उत्तर देण्याच्या त्याच्या खेळीने भारताने जरबदस्त कमबॅक केले. अष्टपैलू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) त्याच्या सोबत खंबीरणे उभा राहिला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी १५०+ धावांची भागीदारी करताना इंग्लंडला बॅकफूटवर फेकले.

काय चौकार... काय षटकार... रिषभ पंतचा शतकी प्रहार!; कसोटी क्रिकेटमध्ये रचला नवा इतिहास 

शुबमन गिल ( १७), चेतेश्वर पुजारा ( १३), हनुमा विहारी ( २०), विराट कोहली ( ११ ) व श्रेयस अय्यर ( १५) हे झटपट माघारी गेल्यामुळे भारताची अवस्था ५ बाद ९८ अशी झाली होती. जेम्स अँडरसनने यापैकी तीन, तर पॉट्सने दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर रिषभ पंतरवींद्र जडेजा ही डावखुरी जोडी खेळपट्टीवर नांगर रोवून उभी राहिली. रिषभने आजच्या सामन्यात सर्वात कमी वयात १०० षटकार खेचणाऱ्या भारतीय फलंदाजासह, सर्वात जलद २०००+ कसोटी धावा करणाऱ्या यष्टिरक्षकाचा विक्रम नावावर केला. १४५ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडमध्ये पाहुण्या संघातील यष्टीरक्षकाने दोन शतक आतापर्यंत कधीच झळकावली नव्हती. पण, रिषभच्या आजच्या शतकाने वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला. रिषभने ८९ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारासह कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केले. पाठोपठ जडेजानेही ११० चेंडूंत अर्धशतक झळकावले. 

रिषभने ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व इंग्लंड येथे चार कसोटी शतकं झळकावली आहेत. एडबस्टन येथे कसोटी शतक झळकावणारा रिषभ हा सचिन तेंडुलकर ( १२२) व विराट कोहली ( १४९) यांच्यानंतरचा तिसरा भारतीय ठरला.  Rishabh Pant becomes only the 3rd Indian batsman in history of Test cricket to score a century at Edgbaston.



Web Title: IND vs ENG 5th Test Match Live Scorecard :  Rahul Dravid'c reaction on Rishabh Pants century tell you how important this century was for the team, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.