Join us  

Virender Sehwag, Ind vs Eng Live test Match : वीरेंद्र सेहवाग म्हणाला 'छमिया नाच रही है!', विराट कोहलीवरील कमेंटने नेटिझन्स भडकले; Video 

Ind Vs Eng test Match live : मोहम्मद सिराज ( ४-६६), जसप्रीत बुमराह ( ३-६८), मोहम्मद शमी ( २-७८) व शार्दूल ठाकूर ( १-४८) या जलदगती गोलंदाजांनी भारताला पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी मिळवून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2022 7:53 PM

Open in App

Ind Vs Eng test Match live : भारताच्या पहिल्या डावातील ४१६ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला. मोहम्मद सिराज ( ४-६६), जसप्रीत बुमराह ( ३-६८), मोहम्मद शमी ( २-७८) व शार्दूल ठाकूर ( १-४८) या जलदगती गोलंदाजांनी भारताला पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी मिळवून दिली. इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने शतक झळकावताना फॉलो ऑन टाळला. माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि बेअरस्टो यांच्यातील वादाने आजचा दिवस गाजवला. पण, इंग्लंडचा पहिला डाव गुंडाळल्यानंतर विराटचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) त्याला छमिया असे म्हणतोय... 

टीम इंडियाच्या पहिल्या डावातील ४१६ धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा निम्मा संघ ८४ धावांवर माघारी परतला होता. अॅलेक्स लीज ( ६), झॅक क्रॅवली ( ९), ऑली पोप ( १०), जो रूट ( ३१) व जॅक लिच ( ०) हे माघारी परतले होते. तिसऱ्या दिवशी जॉनी बेअरस्टो व बेन स्टोक्स यांनी सहाव्या विकेटसाठी ७५ चेंडूंत ६६ धावांची भागीदारी केली. स्टोक्स २५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर बेअरस्टो व सॅम बिलिंग्स यांनी ४९ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. बेअरस्टो १४० चेंडूंत १४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०६ धावांवर बाद झाला. इंग्लंडचा पहिला डाव २८४ धावांवर गडगडला. भारताने पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतली. 

विराट व बेअरस्टो यांच्यातील शाब्दिक वादानंतरही वीरूने एक ट्विट केले होते. त्यात त्याने विराटने स्लेजिंग करण्याआधी बेअरस्टोचा स्ट्राईक रेट २१ होता अन् नंतर तो १५०च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करू लागला. पुजारासारखा खेळत होता, कोहलीने विनाकारण त्याला पंत बनवले.  त्यानंतर विराटचा एक व्हिडीओ व्हायरल झाला,  त्यात तो डान्स करताना दिसतोय. त्याचवेळी हिंदी समालोचन करणारा वीरू त्याला छमिया म्हणाला... 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीविरेंद्र सेहवाग
Open in App