१००व्या कसोटीपूर्वी आर अश्विनवर भारताच्या माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; म्हणाले... 

भारताचा यशस्वी फिरकीपटू आर अश्विन ( Ravichandran Ashwin) ची ही १०० वी कसोटी आहे. भारताचे १०० कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करणारा अश्विन हा १४वा आणि एकूण ७७वा क्रिकेटपटू ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 12:25 PM2024-03-06T12:25:51+5:302024-03-06T12:26:20+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 5th Test : R Ashwin 'cut calls, didn't reply to messages for 100th Test': Laxman Sivaramakrishnan allegations | १००व्या कसोटीपूर्वी आर अश्विनवर भारताच्या माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; म्हणाले... 

१००व्या कसोटीपूर्वी आर अश्विनवर भारताच्या माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; म्हणाले... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 5th Test Dharmashala : भारत-इंग्लंड यांच्यात पाचवी व शेवटची कसोटी उद्यापासून धर्मशाला येथे सुरू होणार आहे. भारताचा यशस्वी फिरकीपटू आर अश्विन ( Ravichandran Ashwin) ची ही १०० वी कसोटी आहे. भारताचे १०० कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करणारा अश्विन हा १४वा आणि एकूण ७७वा क्रिकेटपटू ठरणार आहे. पण, या कसोटीपूर्वी फिरकीपटूवर भारताचे माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवारामकृष्णन ( Laxman Sivaramakrishnan ) यांनी गंभीर आरोप केले आहेत. शिवारामकृष्णन यांनी सोशल मीडियावर अश्विन आपले फोन कट करत असल्याचा आणि मेसेजलाही रिप्लाय देत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. त्याला १००व्या कसोटीपूर्वी शुभेच्छा देण्यासाठी फोन करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


''१००व्या कसोटीसाठी अभिनंदन करण्याकरिता मी त्याला खूपवेळा फोन केले. त्याने माझे कॉल कट केले. त्याला मेसेज पाठवले, पण अद्याप रिप्लाय नाही... माजी क्रिकेटपटूंना ही अशी वागणूक मिळतेय...''असे त्यांनी लिहिले.  


शिवरामकृष्णन यांच्या ट्विटमुळे नेटिझन्स त्यांना ट्रोल करत आहेत. काहींनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांनी अश्विनवर टिका केलेल्या ट्विटचे फोटो पोस्ट केले, त्यावर त्यांनी लिहिले होते की, "भारतातील टेम्पर्ड पिचवर कोणत्याही मूर्खाला विकेट मिळतील". शिवाय त्यांनी अश्विनला 'लायबिलिटी फील्डर' आणि 'सर्वात अनफिट क्रिकेटर' असे म्हटले होते. शिवरामकृष्णन यांचा चाहत्यांकडून सामना होत असताना त्यांनी त्यांच्या आधीच्या विधानांवर स्पष्टीकरण देऊन त्यांना प्रत्युत्तर दिले.

"आदर फक्त सुसंस्कृत लोकांकडूनच येतो. पण, मी आधी त्याच्या गोलंदाजीत किरकोळ सुधारणा केल्याबद्दल ट्विट करत होतो आणि त्याच्यावर टीका केली नव्हती. हे जर लोकांना समजले असेल तर,"असे उत्तर त्यांनी दिले. 
गेल्या वर्षी सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर, शिवरामकृष्णन यांना अश्विनकडून त्याच्या गोलंदाजीच्या कृतीबद्दल चर्चा करण्यासाठी फोन-कॉल आल्याचे उघड झाले. त्यांनी पुढे खुलासा केला की माझ्याबद्दलचा द्वेष पाहून अश्विनला धक्का बसला. "रवी अश्विनने त्याच्या बॉलिंग ॲक्शनवर चर्चा करण्यासाठी मला काही वेळापूर्वी कॉल केला होता, तो माझ्यासारखाच ट्रोल्समुळे हैराण झाला होता,"असे शिवरामकृष्णन यांनी पुढे लिहिले.

भारताचे कसोटी शतकवीर...
अश्विनपूर्वी ही कामगिरी करणाऱ्या १३ भारतीय खेळाडूंमध्ये सुनील गावस्कर ( १२५ ), दिलीप वेंगसरकर ( ११६ ), कपिल देव ( १३१ ), सचिन तेंडुलकर ( २०० ), अनिल कुंबळे ( १३२ ), राहुल द्रविड ( १६४ ), सौरव गांगुली ( ११३ ), व्हीव्हीएस लक्ष्मण ( १३४ ), हरभजन सिंग ( १०३ ), वीरेंद्र सेहवाग ( १०४ ), इशांत शर्मा ( १०५ ), विराट कोहली ( ११३ ) आणि चेतेश्वर पुजारा ( १०३) यांचा समावेश आहे.

Web Title: IND vs ENG 5th Test : R Ashwin 'cut calls, didn't reply to messages for 100th Test': Laxman Sivaramakrishnan allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.