Jasprit Bumrah, IND vs ENG, 5th Test : जसप्रीत बुमराहची 'अतरंगी' फटकेबाजी, गोलंदाजीतही दादागिरी; इंग्लंडचा निम्मा संघ घरी, Video  

India vs Englad, 5th Test : रिषभ पंत ( १४६) व रवींद्र जडेजा यांच्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४१६ धावांपर्यंत मजल मारली. जडेजा १९४ चेंडूंत १३ चौकारांसह १०४ धावांवर बाद झाला. ५ बाद ९८ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियाच्या मदतीला रिषभ व जडेजा ही जोडी २२२ धावांची भागीदारी करून धावून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 11:35 PM2022-07-02T23:35:24+5:302022-07-02T23:37:12+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 5th Test : Ravindra Jadeja 104 runs, Jasprit Bumrah World Record & 3 wickets; England 84 for 5 against India's 1st innings 416 runs, Video | Jasprit Bumrah, IND vs ENG, 5th Test : जसप्रीत बुमराहची 'अतरंगी' फटकेबाजी, गोलंदाजीतही दादागिरी; इंग्लंडचा निम्मा संघ घरी, Video  

Jasprit Bumrah, IND vs ENG, 5th Test : जसप्रीत बुमराहची 'अतरंगी' फटकेबाजी, गोलंदाजीतही दादागिरी; इंग्लंडचा निम्मा संघ घरी, Video  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Englad, 5th Test : भारताने पाचव्या कसोटीच्या पहिल्या दोन्ही दिवसावर वर्चस्व गाजवले. रिषभ पंतच्या दणदणीत शतकानंतर दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाने ( Ravindra Jadeja) शतक झळकावले. पण, कर्णधार जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) खणखणीत फलंदाजीने विश्वविक्रमाची नोंद केली. इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याच्या एका षटकात बुमराहने २९ धावा चोपल्या. त्यानंतर गोलंदाजीतही कमाल दाखवताना बुमराहने यजमानांना धक्के दिले. पावसाच्या व्यत्ययामुळे दिवसाचा बराच वेळ वाया गेला.

Video : कॅप्टन जसप्रीत बुमराह सुसाट... पण, पावसाने अडवली वाट; पाहा आजचे हायलाईट्स... 

रिषभ पंत ( १४६) व रवींद्र जडेजा यांच्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ४१६ धावांपर्यंत मजल मारली. जडेजा १९४ चेंडूंत १३ चौकारांसह १०४ धावांवर बाद झाला. ५ बाद ९८ अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियाच्या मदतीला रिषभ व जडेजा ही जोडी २२२ धावांची भागीदारी करून धावून आली. बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडच्या ( Stuart Broad) एका षटकात २९ धावा चोपल्या आणि कसोटीत एका षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. ब्रॉडच्या त्या षटकात एकूण ३५ धावा आल्या आणि कसोटी क्रिकेटमधील ते सर्वात महागडे षटक ठरले. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बुमराहने १६ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह नाबाद ३१ धावा केल्या.जेम्स अँडरसनने ६० धावा देताना ५ विकेट्स घेतल्या.  


फलंदाजीत कमाल दाखवल्यानंतर कर्णधार जसप्रीतने गोलंदाजीने इंग्लंडचे धाबे दणाणून सोडले. त्याने तिसऱ्याच षटकात सलामीवीर अॅलेक्स लीजचा ( ६) त्रिफळा उडवला. त्यापाठोपाठ पाचव्या षटकात दुसरा ओपनर झॅक क्रॅवली ( ९) याला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या शुबमन गिलकरवी झेलबाद केले. ऑली पोप ( १०) यालाही बाद करताना बुमराहने इंग्लंडची अवस्था ३ बाद ४४ अशी केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा इंग्लंडची विकेट पडली तेव्हा पाऊस त्यांना वाचवण्यासाठी धावून आला. पण, रात्री १०.३० वाजता खेळ सुरू झाला अन् जो रूट व जॉनी बेअरस्टो यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगला सामना केला.

मागील वर्षभरात रूटचा फॉर्म पाहता, तो भारतासाठी डोईजड ठरेल असेच वाटत होते. पण, दिवसाचा खेळ संपायला ७ षटकं शिल्लक असताना मोहम्मद सिराजने ही विकेट मिळवून दिली. सिराजने अंगावर येणारा चेंडू टाकून रूटला तो खेळण्यास भाग पाडले अन् रिषभ पंतने सहज झेल घेतला. रूट ६७ चेंडूंत ३१ धावांवर बाद झाल्याने बेअरस्टोसह त्याची ३४ धावांची भागीदारीही संपुष्टात आणली. नाईट वॉचमॅन म्हणून आलेल्या जॅक लिचचा झेल स्लिपमध्ये विराट कोहलीने टाकला. पण, मोहम्मद शमीने पुढच्या षटकात राऊंड दी विकेट गोलंदाजी करून लिचला ( ०) माघारी पाठवले. इंग्लंडचा निम्मा संघ ८३ धावांत तंबूत परतला. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडच्या ५ बाद ८४ धावा झाल्या होत्या आणि अजूनही ते ३३२ धावांनी पिछाडीवर आहेत. बुमराहने तीन, शमी व सिराजने प्रत्येकी १ विकेट घेतली आहे. 

Web Title: IND vs ENG, 5th Test : Ravindra Jadeja 104 runs, Jasprit Bumrah World Record & 3 wickets; England 84 for 5 against India's 1st innings 416 runs, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.