India vs England 5th Test : पाचव्या कसोटीला एक दिवस असताना भारताला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याची आज पुन्हा कोरोना चाचणी झाली आणि त्यात दुसऱ्या अहवालात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या भारत-इंग्लंड कसोटीत रोहित खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या कसोटीत जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. 35 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये प्रथमच भारताचा जलदगती गोलंदाज कसोटीत नेतृत्व करणार आहे. कपिल देव यांनी 35 वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये कसोटीत भारताचे नेतृत्व केले होते.
लोकेश राहुलने दुखापतीमुळे या मालिकेतून आधीच माघार घेतली होती. त्यात रोहितच्या अनुपस्थितीत शुमबन गिलसोबत सलामीला कोण येणार याची उत्सुकता लागली आहे. भारतीय संघाने आज बर्मिंगहॅम येथे सरावाला सुरूवात केली, परंतु त्यात
रोहित शर्माची अनुपस्थिती टीम इंडियाच्या चिंतेत भर टाकणारी ठरली. रोहितला बॅक अप म्हणून मयांक अग्रवाल लंडनमध्ये दाखल झाला आहे. गिलसह तो सलामीला येण्याची शक्यता वर्तवरण्यात येत आहे. श्रीकर भरतलाही पदार्पणाची संधी मिळू शकते. सराव सामन्यात श्रीकरने दमदार कामगिरी केली आहे.
बायो बबलचे कवच हटवल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर गेलेले भारतीय खेळाडूंना कोरोनाच विसर पडलेला दिसला. रोहित शर्मा, विराट कोहलीसह अनेक खेळाडू लंडनच्या रस्त्यांवर भटकंती करताना दिसले. त्याचा फटका टीम इंडियाला बसला अन् कर्णधार रोहितचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर बीसीसीआयने खेळाडूंना ताकिद दिली, परंतु बर्मिंगहॅम येथे पोहोचल्यानंतर विराट, रिषभ पंत, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर आदी खेळाडू एका रेस्टॉरंटमध्ये दिसले. रोहित क्वांरटाईनमधून बाहेर पडला असला तरी तो पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता मावळली आहे. भारतासाठी हा खूप मोठा धक्का आहे.
Web Title: IND vs ENG 5th Test : Rohit Sharma ruled out of 5th Test against England after testing positive for COVID-19 for second time, Jasprit Bumrah to lead
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.