IND vs ENG 5th Test : भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवून झाल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून जखमेवर मीठ चोळण्याचं काम सुरू झालं आहे. एडबस्टन येथील कसोटीत भारताने साडे तीन दिवस सामन्यावर वर्चस्व राखले होते, परंतु इंग्लंडने जबरदस्त कमबॅक केले आणि अशक्य वाटणारा विजय मिळवला. भारताचे ३७८ धावांचे लक्ष्य जो रूट व जॉनी बेअऱस्टो यांच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला. जॉनी बेअरस्टो १४५ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारासह ११४ धावांवर, तर जो रूट १७३ चेंडूंत १९ चौकार व १ षटकारासह १४२ धावांवर नाबाद राहिला. या सामन्यात विराट कोहली व बेअरस्टो यांच्यात शाब्दिक खटके उडाल्याचे पाहायला मिळाले होते आणि इंग्लंडच्या विजयानंतर क्रिकेट बोर्डाने त्या खटक्यावरूनच विराट कोहलीला ट्रोल केले.
तोंड बंद ठेव! विराट कोहली भडकला, इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोसोबत राडा, Video
भारताने विजयासाठी ठेवलेले ३७८ धावांचे लक्ष्य इंग्लंडने सहज पार केले. जॅक क्रॅवली ( ४६) व अॅलेक्स लीज ( ५६) यांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावा जोडल्या अन् मजबूत पाया रचला. त्यानंतर भारताने २ धावांच्या अंतराने तीन विकेट्स घेत कमबॅक केले. पण, जो रूट ( १४२*) व जॉनी बेअरस्टो ( ११४*) यांनी सर्व गणित बिघडवले. त्यांनी भारतीय गोलंदाजांचा पालापाचोळा केला. या दोघांनी ३१६ चेंडूंत २६९ धावांची नाबाद भागीदारी करताना ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या विजयासोबत इंग्लंडने कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दोन फोटो पोस्ट केले. त्यापैकी पहिल्या फोटोत विराट कोहली इंग्लंडचा फलंदाज बेअऱस्टो याला तोंड बंद ठेव असे बजावताना दिसतोय, तर दुसऱ्या फोटोत पराभावनंतर तोच विराट बेअरस्टोला मिठी मारून अभिनंदन करतोय. यावेळी विराटचा चेहरा पडलेला दिसतोय. ECB ने या दोन्ही फोटोंवर दिलेला इमोजी विराटला ट्रोल करणारा आहे.
Web Title: IND vs ENG 5th Test: Virat Kohli insulted by England Cricket Board; Two photos shared on social media account
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.