IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना राजकोटच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. पहिल्या दोन सामन्यातील विजयासह टीम इंडियाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. दुसरीकडे पाहण्या इंग्लंड संघासाठी मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. मंगळवारी २८ जानेवारीला होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघ राजकोटमध्ये पोहचला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उप कर्णधार अक्षर पटेलची वेगळी अन् हटके झलक दिसली
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत अक्षर पटेल याच्या खांद्यावर उप कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रमोशन दिलेल्या अक्षर पटेलवर तिसऱ्या टी-२० सामन्याआधी बीसीसीआयने एक वेगळी अन् हटके भूमिका पार पाडण्याचे चॅलेंज दिल्याचे पाहायला मिळाले. या ऑलराउंडरनंही ही जबाबदारी एकदम झक्कास पार पाडली. टीम इंडियाचा चेन्नई ते राजकोट प्रवासात अक्षर पटेलचा एक नवा अवतार पाहायला मिळाला.
बीसीसीआयनं हटके अंदाजात शेअर केली टीम इंडियाच्या प्रवासाची गोष्ट
बीसीसीआयने अधिकृत एक्स अकाउंटवरून टीम इंडियाचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात अक्षर पटेल ट्रॅव्हलिंग व्लॉगच्या माध्यमातून टीम इंडियाच्या प्रवासाची खास स्टोरी क्रिकेट चाहत्यांसमोर घेऊन आल्याचे दिसून येते. भारतीय संघ मालिकेत व्यग्र असताना बीसीसीआयकडून सराव सत्रापासून ते ट्रॅव्हलिंग दरम्यानचे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले जातात. पण यावेळी बीसीसीयने ट्रॅव्हल व्लॉगच्या रुपात टीम इंडियातील खास सीन दाखवून दिलाय. या वेगळ्या प्रयोगात बॅटिंग बॉलिंगसह अष्टपैलूत्व सिद्ध करणाऱ्या अक्षर पटेलच्या अंगातील व्लॉगरची झलकही पाहायला मिळाली आहे.
परफेक्ट रोल अन् व्हिडिओमध्ये काही मजेशीर सीन
अक्षर पटेलसाठीही हा क्षण एकदम खास होता. आज काही तरी हटके अन् वेगळं करण्याची संधी मिळाली आहे. "आज बापू व्लोग करेंगे" असं म्हणत टीम इंडियाचा उप कर्णधार नवा रोल अगदी उत्तम पद्धती पार पाडताना पाहायला मिळते. या व्हिडिओमध्ये विमान प्रवासात झोप काढणारा अभिषेक शर्मा ते कॅमरा फोकस करो सीन वेळी सनग्लासेस मागणारा रवी बिश्नोई यांचा मजेशीर सीनही लक्षवेधून घेणारा आहे.