Join us  

Ind vs Eng : भर मैदानात बेन स्टोक्सचा अतरंगीपणा; खाली डोकं, वर पाय! पाहा Video

Ind vs Eng Ben Stokes Stunt : भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात (India vs England, 2nd Test Chennai) भर मैदानात अष्टपैलू बेन स्टोक्सचा अतरंगीपणा पाहायला मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 4:10 PM

Open in App

India vs England, 2nd Test Chennai : चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (M A Chidambaram Stadium) सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघानं मजबूत पकड निर्माण केली आहे. भारतीय संघाचा फिरकीपटू आर.अश्विननं अष्टपैलू कामगिरी करत आज खणखणीत शतकी खेळी साकारली. अश्विनच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ४८१ धावांचं तगडं आव्हान उभं केलं आहे. या सामन्यादरम्यान भर मैदानात अष्टपैलू बेन स्टोक्सचा अतरंगीपणा पाहायला मिळाला. बेन स्टोक्स चक्क उलटा होऊन हातावर चालू लागला होता. (Ind vs Eng Ben Stokes Amazes Fans With Stunt)

भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारताची विकेट पडत नव्हती. अश्विन मैदानात उभं राहून टिच्चून फलंदाजी करत होता. त्यानं इंग्लंडच्या अक्षरश: नाकी नऊ आणले. यातच ड्रिंक्स ब्रेकच्या दरम्यान बेन स्टोक्स चक्क उलटा होऊन चालू लागला. स्टोक्सचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे. बेन स्टोक्स या व्हिडिओत हाताद्वारे चालताना दिसतोय. 

भारतीय संघानं दमदार आव्हान उभारल्यानंतर आणि अश्विनची फलंदाजी पाहून इंग्लंडची बेन स्टोक्ससारखीच ''खाली डोकं, वर पाय'' अशी अवस्था झालीय, असंही नेटिझन्स म्हणू लागले आहेत. बेन स्टोक्सच्या अशा या विचित्र प्रकाराने क्रिकेट चाहत्यांनाही हसू आवरता आलं नाही. 

अश्विनचं दमदार शतकआर अश्विन ( R Ashwin) आणि विराट कोहली ( Virat Kohli) यांच्या ९६ धावांच्या भागीदारीनं टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले आहे. तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात धडाधड पाच फलंदाज माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडेल, असा अंदाज होता. पण, अश्विन व विराट यांनी जुन्या चेंडूचा फायदा उचलताना इंग्लंडच्या गोलंदाजांना कुटले. दोघांनीही दमदार खेळी करताना भारताची आघाडी चारशेपार नेली. घरच्या मैदानावर अश्विननं इंग्लंडचा चांगलाच पाहुणचार केला अन् कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केलं. 

टॅग्स :बेन स्टोक्सभारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयआर अश्विन