India vs England : बेन स्टोक्स आणि जॉन बेअरस्टो खेळपट्टीवर असेपर्यंत चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यात इंग्लंज बाजी मारेल, असेच चित्र होते. पण, राहुल चहर आणि शार्दूल ठाकूर यांनी इंग्लंडला मोक्याच्या क्षणी धक्के दिले आणि अवघ्या ८ धावांनी टीम इंडियानं बाजी मारली. भारतानं या विजयासह मालिका २-२ अशी बरोबरीत आणली आणि आता शनिवारी होणाऱ्या सामन्यात मालिका जेतेपदाचा निकाल लागणार आहे. शार्दूलनं १७व्या षटकात स्टोक्स व इयॉन मॉर्गन यांना सलग दोन चेंडूंवर माघारी पाठवले आणि टीम इंडियाच्या ताफ्यात नवचैतन्य आलं. चौथ्या सामन्यातील पराभवानंतर इंग्लंड संघाला आणखी एक धक्का बसला. चौथ्या सामन्यात षटकांची गती संथ ठेवल्यामुळे इंग्लंडला मॅच फीमधील २० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. ( ENGLAND FINED FOR SLOW OVER-RATE IN FOURTH T20I AGAINST INDIA)
आयसीसीच्या एलिट पॅनलमधील मॅच रेफरी जवागल श्रीनाथ यांनी ही कारवाई केली. इयॉन मॉर्गनच्या संघानं निर्धारीत वेळेत एक षटक कमी फेकलं होतं. त्यामुळे आयसीसीच्या कलम २.२२नुसार त्यांच्यावर २० टक्के दंड भरावा लागणार आहे. मॉर्गननं ही चूक मान्य केली आहे. मैदानावरील पंच केएन अनंथपद्माभन, नितीन मेनन आणि तिसरे पंच विरेंदर शर्मा यांनी हे चार्ज लावले. टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; पाचव्या सामन्यासाठी ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट गोलंदाज परतला
मुंबईकरांनी टीम इंडियाची लाज वाचवली..
सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) मिळालेल्या संधीचं सोनं करताना टीम इंडियाला ८ बाद १८५ धावांपर्यंत मजल मारून दिली. सूर्यकुमारनं ३१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ५७ धावा केल्या. इंग्लंडच्या बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टोनं टीम इंडियाच्या हातून सामना खेचला होता, परंतु शार्दूल ठाकूरनं ( Shardul Thakur) १७व्या षटकात सामना फिरवला. शार्दूलनं इंग्लंडच्या स्टोक्स व कर्णधार इयॉन मॉर्गन यांना सलग दोन चेंडूवर बाद केलं अन् टीम इंडियाच्या ताफ्यात नवचैतन्य संचारले. पण, शार्दूलने टाकलेल्या अखेरच्या षटकानं धाकधूक वाढवली होती, परंतु भारतानं सामना ८ धावांनी जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. इंग्लंडला ८ बाद १७७ धावा करता आल्या. शार्दूलनं ४२ धावांत ३ विकेट्स घेतल्या.
Web Title: IND vs ENG : England have been fined 20 per cent of their match fees for maintaining a slow over-rate in 4th T20I
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.