IND vs ENG: इंग्लंडच्या बॅझबॉल फलंदाजीची हवा काढताना भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत १०६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत दिमाखात पुनरागमन केलेल्या भारताने १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्या डावात ६, तर दुसन्या डावात ३ असे सामन्यात एकूण ९ बळी घेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला.
दुसरा कसोटी सामना चार दिवसांत संपला. तसेच पहिल्या कसोटी सामन्याचा निकालही अवघ्या ४ दिवसांतच लागला होता. आगामी तिसरा कसोटी सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे जवळपास १० दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ भारतात थांबता अबुधाबीला रवाना होणार आहे. तेथे खेळाडू कुटुंबियांसोबत वेळ घालवतील.
भारतात येण्यापूर्वीही इंग्लंडचा संघ अबुधाबीत होता. कसोटी मालिकेच्या तयारीसाठी तेथे एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इंग्लंडचे खेळाडू तिथे होते आणि तयारी करून भारतात होते. आता पुन्हा एकदा इंग्लंडचा संघ तिथे जाणार आहे. त्यामुळे यावेळी पुन्हा एकदा येथे फिरकी खेळपट्टीवर पुरेसा अभ्यास करून भारतात परतण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. तिसऱ्या कसोटी सामन्याआधी इंग्लंड संघ पुन्हा भारतात येईल. या विश्रांतीदरम्यान इंग्लंड संघ येथे गोल्फ खेळाचा आनंदही घेणार आहे.
भारतीय संघाची आज घोषणा होणार?
आज (६ फेब्रुवारी) उर्वरित ३ कसोटी सामन्यांसाठी संघाची घोषणा होऊ शकते. विराट कोहली पहिल्या दोन सामन्यांतून बाहेर होता. तर दुसऱ्या कसोटीत केएल राहुल, रवींद्र जडेजा दुखापतीमुळे बाहेर होते. अशा स्थितीत कोहली आणि राहुलचे शेवटच्या तीन सामन्यांमध्ये पुनरागमन होऊ शकते. तर जडेजाची दुखापत गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तो मालिकेतून बाहेर पडू शकतो. दुसरीकडे, श्रेयस अय्यरला पहिल्या दोन सामन्यात फलंदाजीत आपली छाप सोडता आली नाही. खराब कामगिरी त्याला पुढील तीन सामन्यांतून बाहेर काढू शकते. अशीच अवस्था वेगवान गोलंदाज मुकेश कुमारची होती. दुसऱ्या कसोटीत मुकेश कुमारला छाप पाडता आली नाही.
Web Title: IND vs ENG: England team to go to Abu Dhabi; return to India before the third Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.