Hardik Pandya Set Record India vs England T20I Series : भारतीय संघातील स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या याने इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात मोठ्या कामगिरीची नोंद केली. कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा करत त्याने एका डावात भारताच्या दोन धुरंधर गोलंदाजांना मागे टाकले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत हार्दिक पांड्या भारताचा तिसरा यशस्वी गोलंदाज ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टी-२० मध्ये भुवी-बुमराहपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या
इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात पहिल्या षटकात हार्दिक पांड्या चांगलाच महागडा ठरला. या सामन्यात ४ ओव्हरच्या कोट्यात त्याने ४२ धावा खर्च केल्या. जेकब बेथल आणि जोफ्रा आर्चर यांची विकेट्स घेत त्याने एका डावात दोन दिग्गज गोलंदाजांना मागे टाकले. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहला ओव्हरटेक करत पांड्या आता तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे.
२ विकेट्स घेत हार्दिक पांड्यानं मारली टॉप ३ मध्ये एन्ट्री
हार्दिक पांड्याने ११० टी-२० सामन्यातील ९८ डावात ९१ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. भुवनेश्वर कुमारनं ८६ डावात ९० तर जसप्रीत बुमराहनं ६९डावात ८९ विकेट्स घेतल्या आहेत. भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप ९७ विकेट्ससह टॉपला आहे. त्याच्यापाठोपाठ युजवेंद्र चहल (९६) नंतर या यादीत आता हार्दिक पांड्याचा नंबर लागतो.
दहाव्या 'नॉट आउट' इनिंगचाही खास रेकॉर्ड
इंग्लंडच्या संघाने पहिल्या टी-२० सामन्यात निर्धारित २० षटकात १३२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. हार्दिक पांड्या ३ धावांवर नाबाद राहिला. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात दहव्यांदा तो नॉट आउट राहिला. या खास कामगिरीच्या बाबतीत रोहित शर्मासोबत तो संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर आहे.
Web Title: IND vs ENG Hardik Pandya Creates History Breaks Bhuvneshwar Kumar And Jasprit Bumrahs Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.