India vs England 3rd Test : लिड्स कसोटीतील पराभवानंतर टीम इंडिया पुन्हा मुसंडी मारण्यासाठी सज्ज झाली आहे. मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश ही टीम इंडियाची प्रमुख डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीत संघात बदल केले जातील, असे संकेत कर्णधार विराट कोहलीनं दिले होते. त्यात तिसऱ्या कसोटीनंतर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याला व्यवस्थापकिय टीमनं हॉस्पिटलमध्ये नेल्यानं टेंशन वाढलं आहे. त्यामुळे जडेजा चौथ्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी जडेजाच्या दुखापतीबाबतचे मोठे अपडेट्स समोर आले आहेत.
वेस्ट इंडिजचे धडाकेबाज फलंदाज IPL 2021 गाजवणार, राजस्थान रॉयल्सला सावरणार!
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटीत टीम इंडियानं संघात फार बदल केले नाही. त्यात आर अश्विननं अंतिम ११मध्ये खेळायला हवे असे सर्वांचे मत असताना कर्णधार कोहली रवींद्र जडेजावर ठाम राहिला. जडेजाला तीन सामन्यांत १३३ धावा आणि फक्त दोन विकेट्स घेतल्या आहेत. तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सराव करताना रवींद्र जडेजाचा पाय दुखावला होता आणि काही काळासाठी त्यानं मैदान सोडले होते. तिसऱ्या कसोटीत जडेजानं २५ चेंडूंत ३० धावा केल्या. सामना संपल्यानंतर जडेजा त्याच्या पायाला झालेल्या दुखापतीचे स्कॅन करण्यासाठी गेला होता. त्यानं हा फोटो पोस्ट केला. त्याची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप BCCIनं सांगितलं नाही.
वीरेंद्र सेहवगानं KBC 13 मध्ये ग्रेग चॅपल यांच्यावरून सौरव गांगुलीची घेतली फिरकी, Video Viral
तिसऱ्या सामन्यानंतर विराटनं २ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत बदलाचे संकेत दिले. त्यानुसार अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, इशांत शर्मा व रवींद्र जडेजा यांच्यावर टांगती तलवार आहे. लोकेश राहुलला यष्टिंमागे उभे करून मयांक अग्रवालला मधल्या फळीत खेळवण्याचा विचार केला जाऊ शकतो. अजिंक्यच्याजागी सूर्यकुमार यादवला, इशांतच्या जागी शार्दूल ठाकूरला आणि रवींद्रच्या जागी आर अश्विन किंवा हनुमा विहारी यांचा विचार होऊ शकतो. पण, जडेजा चौथ्या कसोटीत निवडीसाठी तंदुरुस्त झाला आहे. जडेजानं इंस्टाग्रावर सराव करतानाचे फोटो पोस्ट करून याबाबत माहिती दिली. आता विराट त्याला आणखी एक संधी देतो का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.