ठळक मुद्दे१७ कसोटी व ७९ विकेट्सनंतर बुमराह प्रथमच घरच्या मैदानावर कसोटी खेळतोय...मोहम्मद सिराज व कुलदीप यादव याला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी नाही
India vs England, 1st Test : जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आज घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळत आहे. भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यातला पहिला कसोटी सामना आजपासून चेन्नईत सुरू झाला. १७ कसोटी सामने व ७९ विकेट्सनंतर बुमराहला भारतात पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. पण, पहिल्याच चेंडूवर रिषभ पंतनं ( Rishabh Pant) यष्टिंमागे इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स ( Rory Burns) याचा झेल सोडला. ओव्हर दी विकेट गोलंदाजी करताना बुमराहनं टाकलेला चेंडू बर्न्सच्या बॅटची कडा घेत उजव्या बाजूला पंतच्या दिशेनं गेला, परंतु पंतला तो अवघड झेल टिपता आला नाही. जसप्रीत बुमराहची प्रतीक्षा संपली; मैदानावर उतरताच विक्रमाला गवसणी घातली
रोरी बर्न्स व डॉम सिब्ली या जोडीनं संयमानं खेळ करताना बुमराह व इशांत शर्मा यांचा सामना केला. त्यामुळे आठव्या षटकातच कर्णधार विराट कोहलीनं आर अश्विनच्या हाती चेंडू सोपवला. अश्विननं कारकिर्दीत आठवेळा कसोटी क्रिकेटच्या पहिल्या डावात पहिल्या दहा षटकांत गोलंदाजी केली आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
टीम इंडिया (Playing XI): रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह,
इंग्लंड (Playing XI): डॉम सिब्ली, रोरी बर्न्स, डॅन लॉरेन्स, जो रुट, बेन स्टोक्स, ऑली पोप, जोस बटलर, डॉम बेस, जोफ्रा आर्चर, जॅक लीच, जेम्स अंडरसन
१७ कसोटी व ७९ विकेट्सनंतर बुमराह प्रथमच घरच्या मैदानावर कसोटी खेळतोय...
५ जानेवारी २०१८मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जसप्रीत बुमराहनं कसोटी संघात पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं इंग्लंड, ऑस्ट्रेलिया. वेस्ट इंडिज व न्यूझीलंड असे दौरे गाजवले. त्यानं १७ कसोटी सामन्यांत ७९ विकेट्स घेतल्या आणि ६ बाद २७ ( वि. वेस्ट इंडिज) ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. आज मायदेशात बुमराह प्रथमच कसोटी सामना खेळत आहे. तब्बल तीन वर्षांनंतर त्याला मायदेशात कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. Bad News; सामना सुरू होण्याआधीच टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे खेळाडूची माघार
यापूर्वी जवागल श्रीनाथनं १२ कसोटीनंतर मायदेशात पहिला सामना खेळला होता. आर पी सिंग ( ११) व सचिन तेंडुलकर ( १०) यांनाही ही प्रतीक्षा करावी लागली. घरच्या मैदानावर पहिला सामना खेळण्यासाठी १७ किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांची प्रतीक्षा पाहावी लागलेला बुमराह हा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजच्या डॅरेन गंगा ( Daren Ganga) यानं १९९८मध्ये दक्षिण आफ्रिकेत कसोटी पदार्पण केलं आणि त्यानंतर एप्रिल २००३मध्ये घरच्या मैदानावर पहिला कसोटी सामना खेळला.
Web Title: IND vs ENG : Jasprit Bumrah's first ball in a home Test & Rishabh Pant puts down a low chance
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.