Join us  

Good News : टीम इंडियाचा स्टार फलंदाज तंदुरूस्त झाला, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी चेन्नईत दाखल

India vs England :  तीनही कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सोमवारपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सरावाला सुरुवात केली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 02, 2021 1:44 PM

Open in App
ठळक मुद्दे५ फेब्रुवारीपासून भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीला सुरुवातविराट कोहली, हार्दिक पांड्या, इशांत शर्मा यांचे पुनरागमन

India vs England :  तीनही कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सोमवारपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सरावाला सुरुवात केली. ५ फेब्रुवारीला दोन्ही संघांमध्ये मालिकेतील पहिला सामना सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटीनंतर रजेवर गेलेला कर्णधार विराट कोहलीचे ( Virat Kohli) पुनरागमन होत असल्यानं चाहते आनंदात आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटानंतर टीम इंडिया प्रथमच मायदेशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका खेळणार आहे, त्यामुळे सर्वांना या मालिकेची उत्सुकता आहे. त्यात टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. टीम इंडियातील स्टार फलंदाज दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून तोही चेन्नईत दाखल होण्यासाठी निघाला आहे. Video : हार्दिक पांड्यानं शेअर केला वडीलांचा Emotional व्हिडीओ; म्हणाला, मला रडू आवरेना... 

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून मायदेशात परतले आहेत, तर इंग्लंडनेही श्रीलंकेला त्यांच्याच घरी २-० असे पराभूत केले आहे. त्यामुळे दोन्ही संघ सकारात्मकतेनं एकमेकांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत होतील आणि दुसऱ्या सामन्यात ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियमवर उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. उर्वरित दोन सामने अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर होतील. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियावर दुखापतींचं ग्रहण आलं होतं. इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, आर अश्विन, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा आदी खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. Video : चेंडू सीमारेषेपार जात असताना खेळाडू जर्सी बदलत राहिला अन् एकच हशा पिकला!

या मालिकेसाठी फलंदाज लोकेश राहुल ( KL Rahul) तंदुरूस्त झाला असून तो चेन्नईत दाखल होण्यासाठी निघाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अखेरच्या दोन कसोटींपूर्वी राहुल दुखापतग्रस्त झाला आणि त्यानंतर तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी आला. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. ''मी पूर्णपणे तंदुरुस्त झालो आहे, हे सांगताना आनंद होतोय. यापेक्षा चांगली फिलींग असूच शकत नाही. घरच्या मैदानावर होणाऱ्या मालिकेसाठी उत्सुक आहे,''असे राहुलनं ट्विट केलं.  ३४ कोटींच्या घरात राहतेय विराट-अनुष्काची लेक 'वामिका'; पाहा आलिशान घराचे Inside Photo

भारत - रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर; 

नेट बॉलर : अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, के. गौतम आणि सौरभ कुमार; 

राखीव खेळाडू : के. एस. भरत (यष्टीरक्षक), शाहबाज नदीम, राहुल चाहर आणि अभिमन्यू ईश्वरन.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडलोकेश राहुलविराट कोहलीजसप्रित बुमराहरवींद्र जडेजा