IND vs ENG: 'तुझा गर्व खिशात ठेव आणि...', 'फ्लॉप' ठरत असलेल्या कोहलीवर भारताच्या माजी क्रिकेटपटूचं शरसंधान

India vs England, 3rd Test: कोहलीनं आपला हट्ट जरासा बाजूला ठेवून खेळपट्टीवर जास्तीचा वेळ देण्याचा प्रयत्न करायला हवा, असं मनिंदर सिंग म्हणाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 09:22 AM2021-08-26T09:22:51+5:302021-08-26T09:24:52+5:30

whatsapp join usJoin us
ind vs eng leeds test keep ego into your pocket maninder singh urges virat kohli | IND vs ENG: 'तुझा गर्व खिशात ठेव आणि...', 'फ्लॉप' ठरत असलेल्या कोहलीवर भारताच्या माजी क्रिकेटपटूचं शरसंधान

IND vs ENG: 'तुझा गर्व खिशात ठेव आणि...', 'फ्लॉप' ठरत असलेल्या कोहलीवर भारताच्या माजी क्रिकेटपटूचं शरसंधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 3rd Test: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडून फलंदाजीत सातत्यानं निराशाजनक कामगिरी होत आहे. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात कोहली अवघ्या ७ धावा करुन माघारी परतला. इंग्लंडचा दिग्गज जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर कोहली यष्टीरक्षक जोस बटलरकडे झेल देऊन बसला आणि तंबूत दाखल झाला. 

मोहम्मद सिराजला डिवचायला गेले अन् इंग्लंडचे फॅन्स स्वतःच्याच तोंडावर आपटले, पाहा नेमके काय घडले

लीड्सवर सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीआधी विराट कोहलीनं माध्यमांशी संवाद साधताना इंग्लंडच्या धरतीवर तुम्हाला तुमचा गर्व खिशात ठेवायला हवा असं विधान केलं होतं. याच विधानावरुन भारताचे माजी क्रिकेटपटू मनिंदर सिंग यांनी कोहलीला त्यानंच दिलेला सल्ल्याची आठवण करुन दिली आहे. कोहलीनं आपला हट्ट जरासा बाजूला ठेवून खेळपट्टीवर जास्तीचा वेळ देण्याचा प्रयत्न करायला हवा, असं मनिंदर सिंग म्हणाले. 

...जेव्हा लाँग रूममध्ये भिडले खेळाडू; भारत आणि इंग्लंडमध्ये वाद

"विराट जर त्याच्या नेहमीच्या अंदाजानुसार दबाव निर्माण करुन खेळू इच्छित असेल तर लीड्सची खेळपट्टी त्यास योग्य नाही हे त्यानं लक्षात घ्यायला हवं. आक्रमक फलंदाजी येथं करता येणार नाही. त्यानं खेळपट्टीवर जरा वेळ व्यतित करायला हवा. याआधीच्या दौऱ्यात ज्यापद्धतीनं खेळपट्टीवर वेळ घालवून जवळपास ६०० धावा त्यानं केल्या होत्या. खेळपट्टीच्या गतीचा एकदा अंदाज आला की तुम्ही निर्भयतेनं खेळू लागता", असं मनिंदर सिंग म्हणाले. 

अँडरसनने केली कोहलीची सातव्यांदा शिकार; लीड्सवर  इंग्लंडने  घेतली ‘लीड’

एक पाय पुढे ठेवून शॉट्स खेळण्यासाठी ही काय भारतीय खेळपट्टी नाही. कोहलीनं सांगितलं होतं की अभ्यास करण्याची गरज आहे. त्याच पद्धतीनं त्यानं आपला गर्व जरा खिशात ठेवायला हवा आणि खेळायला हवं, असं रोखठोक विधान मनिंदर सिंग यांनी केलं आहे. कोहली सातत्यानं एकाच प्रकारची चूक करत असल्यानं संताप व्यक्त होत असल्याचंही ते म्हणाले. 

इंग्लंडविरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत कोहलीनं चार डावांमध्ये १७.२५ च्या सरासरीनं केवळ ६९ धावा केल्या आहेत. नॉटिंघममध्ये अनिर्णित राखल्या गेलेल्या कसोटीतही कोहली काही खास कामगिरी करू शकला नव्हता. पहिल्या डावात कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. जेम्स अँडरसननं कोहलीची विकेट घेतली होती. तर लॉड्समध्ये कोहलीनं पहिल्या डावात ४२ आणि दुसऱ्या डावात २० धावा केल्या होत्या. 

Web Title: ind vs eng leeds test keep ego into your pocket maninder singh urges virat kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.