IND vs ENG: उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला मोठा दिलासा; इंग्लंडचा घातक गोलंदाज झाला बाहेर

आज उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 01:38 PM2022-11-10T13:38:22+5:302022-11-10T13:39:23+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG Mark Wood has been ruled out of England's T20 World Cup semi-final against India  | IND vs ENG: उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला मोठा दिलासा; इंग्लंडचा घातक गोलंदाज झाला बाहेर

IND vs ENG: उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला मोठा दिलासा; इंग्लंडचा घातक गोलंदाज झाला बाहेर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

डिलेड । T20 World Cup, India vs England Semi Final Live : आज विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना खेळवला जात आहे. या बहुचर्चित सामन्याच्या पूर्वसंध्येलाच भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून बाहेर झाला आहे. खरं तर पाकिस्तानने अनपेक्षित कामगिरी करताना टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आज भारत-इंग्लंड यांच्यातल्या सामन्यातून जेतेपदाचा दुसरा दावेदार ठरणार आहे. क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा India vs Pakistan असा ड्रिम सामना पाहायचा आहे. त्यामुळेच आजच्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. India vs England यांची लढत डिलेड ओव्हलवर होणार आहे, परंतु काल येथे रात्रभर वादळी वारा अन् मुसळधार पाऊस पडला आहे. पण, सध्यातरी पावसाची शक्यता दिसत नाही..

इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. डेव्हिड मलान व मार्क वुड हे मुख्य खेळाडू इंग्लंडच्या संघात आज खेळणार नाहीत. ख्रिस जॉर्ड व फिल सॉल्ट यांना संधी मिळाली आहे. इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन भारताला आयती संधी दिल्याचे बोलले जात आहे. रिषभ पंतला संघात कायम राखले आहे भारतीय संघात बदल करण्यात आलेला नाही. लक्षणीय बाब म्हणजे इंग्लंडचा घातक गोलंदाज मार्क वुड आजच्या सामन्यातून बाहेर झाल्यामुळे भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी. 

आजच्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - 
जोस बटलर (कर्णधार), ॲलेक्स हेल्स, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: IND vs ENG Mark Wood has been ruled out of England's T20 World Cup semi-final against India 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.