India vs England : टीम इंडियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशा पिछाडीवर गेलेल्या यजमान इंग्लंडच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. या मालिकेपूर्वी बेन स्टोक्स व जोफ्रा आर्चर या दोन प्रमुख खेळाडूंनी माघार घेतली. त्यात दोन सामन्यानंतर माघार सत्र सुरूच आहे. स्टुअर्ट ब्रॉड, ऑली स्टोक्स व ख्रिस वोक्स यांच्यापाठोपाठा आणखी एका खेळाडूनं माघार घेतली आहे. लॉर्ड्स कसोटीत पाच विकेट्स घेणारा जलदगती गोलंदाज मार्क वूड दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही. त्यामुळे इंग्लंडची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
रवी शास्त्री यांचाच भीडू होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक, राहुल द्रविडच्या माघारीनंतर नवा ट्विस्ट!
लॉर्ड्स कसोटीत सरावादरम्यान मार्क वूडच्या खांद्याला दुखापत झाली होती. तरीही त्याचा तिसऱ्या कसोटीसाठीच्या संघात समावेश करण्यात आलेला होता. वैद्यकीय टीम मार्क वूडच्या दुखापतीवर लक्ष ठेवून होती, तेव्हा तो तिसऱ्या कसोटीपूर्वी फीट होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. पण, इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डानं तो तिसऱ्या कसोटीत खेळणार नसल्याचे जाहीर केले.
तिसऱ्या कसोटीसाठी तगडा फलंदाज संघातमर्यादित षटकांमध्ये अव्वल दर्जाचा फलंदाज डेव्हिड मलान याला इंग्लंडनं पाचारण केलं आहे. इंग्लंडच्या डॉम सिब्लीच्या जागी डेव्हिड मलान याला संधी देण्यात आली आहे. डेव्हिड मलान संघात तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला उतरण्याची शक्यता आहे. तर हसीब हमीद आणि रोरी बर्न्स इंग्लंडकडून सलामीला उतरतील. ओली पोप याचाही संघात समावेश करण्यात आला असून तो मधल्या फळीत खेळताना दिसू शकतो.
असा आहे इंग्लंडचा संघ-जो रूट (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, मोइन अली, सॅम कुरन, क्रेग ओवरटोन, जेम्स अँडरसन, हसीब हमीद, ओली पोप, जॉनी बेअरस्टो, डॅन लॉरेन्स, ओली रॉबिन्सन, रोरि बर्न्स, सकिब महमूद, मार्क वूड