India vs England ODIs full schedule : भारताविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी इंग्लंडनं रविवारी संघ जाहीर केला. कसोटी ( १-३) व ट्वेंटी-20 ( २-३) मालिकेत पराभव झाल्यानंतर निदान वन डे मालिकेत विजय मिळवण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे. त्यांनी जाहीर केलेल्या संघातून जोफ्रा आर्चरला ( Jofra Archer) दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे आणि आता तो उपचारासाठी लंडनमध्ये परतणार आहे. वन डे मालिकेत जोफ्रा आर्चरच्या नसण्यानं राजस्थान रॉयल्सलाही ( Rajasthan Royals) संघालाही मोठा धक्का बसला आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) पहिल्या टप्प्याला जोफ्रा आर्चर मुकणार असल्याचे माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डानं दिली. त्यामुळे RRचे टेंशन वाढले आहे. ( ECB confirms Jofra Archer will miss the first part of IPL 2021). जोफ्रासह, जो रूट व ख्रिस वोक्स हेही वन डे मालिकेत खेळणार नाहीत. टीम इंडियानं बाजी मारली, खेळाडूंना बक्षीस रूपी किती रक्कम मिळाली माहित्येय?
इंग्लंडचा संघ ( England's ODI squad against India) - इयॉन मॉर्गन, मोईन अली, जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग, जोस बटलर, लाएम लिव्हिंगस्टोन, मॅट पर्किसन, आदिल राशिद, रिरे टॉपली, मार्क वूड, टॉम व सॅम कुरन
राखीव खेळीडू - जॅक बॉल, ख्रिस जॉर्डन व डेवीड मलान
भारतीय संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, लोकेश राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दूल ठाकूर.
सामने कधी व कोठे?
पहिला सामना - २३ मार्च, दुपारी १.३० वाजल्यापासूनदुसरा सामना - २६ मार्च, दुपारी १.३० वाजल्यापासूनतिसरा सामना - २८ मार्च, दुपारी १.३० वाजल्यापासूनथेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स व हॉटस्टारस्थळ - सर्व सामने पुण्यात होतील