इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी भारतीय संघानं शुक्रवारी संघ जाहीर केला. या संघात दोन नवीन चेहरे दिसत आहेत. सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) ट्वेंटी-20 मालिकेतून पदार्पण केलं असलं तरी प्रसिद्ध कृष्णा ( Prasidh Krishna ) या नावानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कर्नाटकच्या या गोलंदाजानं नवदीप सैनीला मागे टाकून वन डे मालिकेसाठी टीम इंडियात आपले स्थान पक्के केले. वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; कृणाल पांड्या, प्रसिद्ध कृष्णा यांना संधी
प्रसिद्ध कृष्णा याच्या नावावर ५० लिस्ट ए सामनेही नाहीत, परंतु नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत त्यानं सर्वांचे लक्ष वेधले. त्यानं ४८ लिस्ट ए क्रिकेटम्ये ५.१७च्या इकॉनॉमीनं ८१ विकेट्स घेतल्या आहेत आणि ९ प्रथम श्रेणी सामन्यांत ३४ विकेट्स व ४० ट्वेंटी-20त ३३ विकेट्स घेतल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफीत त्यानं १४ विकेट्स घेतल्या आहेत. Soft Signal'वर भडकला विराट कोहली; म्हणाला, अम्पायरकडे I don't know call हा पर्याय का नाही?
२५ वर्षीय गोलंदाजानं २०१५मध्ये बांगलादेश ए संघाच्या भारत दौऱ्यावर चांगली कामगिरी केली होती आणि तेव्हा सर्वप्रथम हे नाव चर्चेत आले. त्यानं कर्नाटक संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बांगलादेश ए संघाविरुद्ध ४९ धावा देताना पाच विकेट्स घेतल्या. त्यानं रॉनी तालुकदार याची विकेट घेतली होती आणि त्यानंतर अनामुल हक, सौम्य सरकार व नासिर हुसैन यांना माघारी पाठवले. कर्नाकटने हा सामना चार विकेट्सनं जिंकला होता. प्रगिद्धनं २०१६-१७मध्ये विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतून लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं २०१७-१८मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून ट्वेंटी-२०त पदार्पण केलं. २०१८-१९च्या विजय हजारे ट्रॉफीत त्यानं कर्नाटककडून सर्वाधिक १३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या पराभवामागे रोहित शर्माचं डोकं; शार्दूल ठाकूरला दिला मंत्र अन् टीम इंडियाची बाजी
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सचा सदस्य आहे. त्यानं आतापर्यंत २४ सामन्यांत १८ विकेट्स घेतल्या आहेत. २०१८च्या पर्वात त्यानं ७ सामन्यांत १०, २०१९मध्ये ११ सामन्यांत ४ आणि २०२०मध्ये सहा सामन्यांत ४ विकेट्स घेतल्या होत्या.
Web Title: IND vs ENG, ODI Team : Suryakumar Yadav and Prasidh Krishna got maiden ODI call, know about KKR pacer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.