Join us  

IND vs ENG : टीम इंडियानं चौथ्या कसोटीसाठी राखीव गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा संघात केला समावेश!

India vs England, 4th Test : लिड्स कसोटीत टीम इंडिया पराभूत झाल्यानंतर मालिका १-१ अशा बरोबरीत आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 2:56 PM

Open in App

India vs England, 4th Test : लिड्स कसोटीत टीम इंडिया पराभूत झाल्यानंतर मालिका १-१ अशा बरोबरीत आली आहे. लॉर्ड्सवर विजय मिळवून आनंदात असणाऱ्या विराट कोहली अँड कंपनीला तिसऱ्या कसोटीत इंग्लंडनं जमिनीवर आदळले. जो रूटच्या नेतृत्वाखाली इंग्लंडनं तिसरी कसोटी १ डाव व ७६ धावांनी जिंकली. भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीला २ सप्टेंबरपासून ओव्हल येथे सुरूवात होणार आहे. चौथ्या कसोटीत इंग्लंडच्या ताफ्यात ख्रिस वोक्स, सॅम बिलिंग आणि मार्क वूड हे तगडे खेळाडू परतले आहेत आणि त्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. पण, टीम इंडियानंही मोठा डाव टाकला आहे. चौथ्या कसोटीत संघात बदल पाहायला मिळेल, याची शक्यता कर्णधार विराट कोहलीनं व्यक्त केलाच होता. त्याचाच भाग म्हणून संघ व्यवस्थापनानं चौथ्या कसोटीसाठी अंतिम संघात राखीव फळीतील गोलंदाजाचा समावेश केला.

इंग्लंडचा कर्णधार जो रूट अव्वल, रोहित शर्मानं कॅप्टन विराट कोहलीला टाकले मागे

चौथ्या कसोटीत आर अश्विनला संधी मिळण्याची शक्यता आहे. इशांत शर्माच्या जागी शार्दूल ठाकूरही खेळेल, असा अंदाज व्यक्त  केला जात आहे. विराट कोहलीला अंतिम ११ फायनल करण्यापूर्वी नीट विचार करावा लागणार आहे, कारण भारतीय संघाचा ओव्हलवरील इतिहास फार चांगला नाही. १९७१ मध्ये भारतानं येथे एकमेव विजय मिळवला आहे. भारतानं १३ सामन्यांत पाच सामने गमावले आहेत आणि सात अनिर्णित निकाल लागले आहेत. २००७, २०१४ व २०१८ या मागिल तीनही मालिकांमधील ओव्हलवर झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. 

भारतीय संघ व्यवस्थापनानं राखीव गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याचा मुख्य संघात समावेश केला आहे. बीसीसीआयनं अशी माहिती दिली आहे. प्रसिद्ध कृष्णा याच्या नावावर ५० लिस्ट ए सामनेही नाहीत, परंतु नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत त्यानं सर्वांचे लक्ष वेधले. त्यानं ४८ लिस्ट ए क्रिकेटम्ये ५.१७च्या इकॉनॉमीनं ८१ विकेट्स घेतल्या आहेत आणि ९ प्रथम श्रेणी सामन्यांत ३४ विकेट्स व ४० ट्वेंटी-20त ३३ विकेट्स घेतल्या आहेत. विजय हजारे ट्रॉफीत त्यानं १४ विकेट्स घेतल्या आहेत.   भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, वृद्धीमान सहा, अभिमन्यू इस्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा. ( India’s squad for the fourth Test: Rohit Sharma, KL Rahul, Mayank Agarwal, Cheteshwar Pujara, Virat Kohli (Captain), Ajinkya Rahane (vice-captain), Hanuma Vihari, Rishabh Pant (wicket-keeper), R. Ashwin, Ravindra Jadeja, Axar Patel, Jasprit Bumrah, Ishant Sharma, Mohd. Shami, Md. Siraj, Shardul Thakur, Umesh Yadav, Wriddhiman Saha (wicket-keeper), Abhimanyu Easwaran, Prithvi Shaw, Suryakumar Yadav, Prasidh Krishna) 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघ
Open in App