Team India, IND vs ENG 2nd Test: भारतीय संघाचा इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात धक्कादायकरित्या पराभव झाला. पहिल्या दोन दिवसांत सामन्यावर मजबूत पकड असलेला भारतीय संघ पुढील दोन दिवसांत थेट पराभूत झाला. ओली पोपची झुंजार १९६ धावांची खेळी आणि चौथ्या डावांत हार्टलीचे ७ बळी यांच्या जोरावर इंग्लंडने अख्खा सामना फिरवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेचा पहिलाच सामना गमावणे हा भारतासाठी एक धक्काच मानला जात आहे. तशातच भारतासाठी आणखी एक धक्काही बसण्याची शक्यता आहे. एक स्टार खेळाडू कदाचित दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
टीम इंडियाला सध्या आणखी एक धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाला हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली असून, त्याच्या पुढील कसोटीत खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. रविवारी मालिकेतील पहिली कसोटी टीम इंडियाच्या पराभवाने संपली. भारतीय संघाला विजयासाठी २३१ धावांची गरज होती पण भारताचा डाव २०२ धावांतच आटोपला. एक धाव घेण्याचा मोह जाडेजाला महागात पडला. भारताच्या दुसऱ्या डावात स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा जखमी झाला. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना जडेजाने झटपट धावा काढण्याचा प्रयत्न केला. पण स्नायूंवर ताण पडल्याने तो धावबाद झाला आणि आता त्याला पुढच्या कसोटीत खेळता येईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. पण त्याला यश आले नाही आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे उदाहरण दाखवत त्याला धावबाद केले. जडेजाचा धावबाद हा टीम इंडियासाठी मोठा धक्का होता कारण इथून पुढे त्याची जिंकण्याची शक्यता कमी होत गेली आणि शेवटी त्याला पराभवाला सामोरे जावे लागले.
जाडेजाची विकेट पडणे भारतासाठी चिंतेची बाब होती. जेव्हा तो पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा त्याला नीट चालता येत नव्हते. जाडेजाच्या हॅमस्ट्रिंगमध्ये समस्या असल्याने वातावरण अधिकत चिंतेचे झाले. पण पीटीआयच्या वृत्तानुसार, द्रविडने सांगितले की मी अद्याप याविषयी संघाच्या फिजिओंशी बोललेलो नाही आणि त्यामुळे हे किती गंभीर आहे याबद्दल काहीही सांगता येणार नाही.
दुसऱ्या कसोटीतून माघार घेण्याची शक्यता
वृत्तानुसार, हॅमस्ट्रिंगची दुखापत किती गंभीर असेल हे ठरवेल की जाडेजा मालिकेत कधी खेळू शकेल. जरी दुखापत किरकोळ असल्याचे सिद्ध झाले, तरीही पूर्णतः फिट होण्यासाठी एक आठवड्याची विश्रांती दिली जाते. पुढील कसोटी २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे होणार आहे. अशा स्थितीत जाडेजा त्या कसोटीतून माघार घेऊ शकतो.