Join us  

टीम इंडियाला 'डबल धक्का'! जाडेजा, राहुल दुसऱ्या कसोटीतून बाहेर; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

भारतीय संघाची लागणार 'कसोटी'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 4:47 PM

Open in App

Team India Changes, Ravindra Jadeja KL Rahul, IND vs ENG 2nd Test भारतीय संघासाठी मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि दमदार फलंदाज केएल राहुल दोघांनीही २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे सुरू होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे. हैदराबादमधील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळताना जाडेजाच्या हाताला दुखापत झाली होती, तर राहुलने उजव्या बाजूच्या क्वाड्रिसिप्समध्ये दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यामुळे या दोघांनी माघार घेतल्याचे बीसीसीआयने ट्विट करून कळवले आहे. त्यांच्या जागी सर्फराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांना भारताच्या संघात सामील करण्यात आले आहे.

सर्फराज खान सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता. परंतु त्याला संधी मिळू शकलेली नव्हती. राहुल आणि जाडेजा यांच्या दुखापतीचा सर्फराजला अप्रत्यक्षपणे फायदाच झाला. त्याला संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय अहमदाबाद येथे १ फेब्रुवारीपासून इंग्लंड लायन्स विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम बहु-दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघात वॉशिंग्टन सुंदर होता, त्याजागी सरांश जैनची निवड करण्यात आली आहे. आवेश खान सध्या मध्य प्रदेश संघासोबत रणजी करंडक स्पर्धा खेळत आहे, पण गरज पडल्यास तोदेखील टीम इंडियात दाखल होईल असेही सांगण्यात आले आहे. 

इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा बदललेला संघ: रोहित शर्मा (क), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (य), ध्रुव जुरेल (य), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपक), आवेश खान, रजत पाटीदार, सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघइंग्लंडरवींद्र जडेजालोकेश राहुल