Join us  

IND vs ENG : भारताचा स्टार खेळाडू तिसऱ्या कसोटीला, तर जलदगती गोलंदाज संपूर्ण मालिकेला मुकणार 

India vs England Test Series - भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धक्क्यांमागून धक्के बसताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 5:30 PM

Open in App

India vs England Test Series ( Marathi News ) - भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धक्क्यांमागून धक्के बसताना दिसत आहेत. विराट कोहलीने आधीच पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतली असताना हैदराबाद कसोटीनंतर रवींद्र जडेजा व लोकेश राहुल यांना दुखापतीमुळे बाहेर जावे लागले. मोहम्मद शमीही दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. भारत-इंग्लंड यांच्यातला दुसरा कसोटी सामना उद्यापासून विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ या मालिकेत ०-१ असा आधीच पिछाडीवर असताना आणखी एक धक्का देणारी बातमी समोर येत आहे. 

रोहित शर्माची सराव सत्राला दांडी! भारताच्या फक्त सहा खेळाडूंनी नेटमध्ये गाळला घाम

क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार जडेजाला हॅमस्ट्रींग दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी ४ ते ८ आठवडे पुरेसे असतात, परंतु जडेजाला त्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतही खेळण्याची शक्यता मावळली आहे. रांची येथे २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ही कसोटी होणार आहे. मोहम्मद शमीच्या दुखापतीतचे अपडेट्स पाहता तो या संपूर्ण मालिकेलाच मुकणार आहे.

शमी सध्या लंडनमध्ये आहे आणि त्याच्यावर त्वरित शस्त्रक्रिया करण्याची सध्यातरी आवश्यकता नसल्याचे वृत्त हाती आहे. पण, घोट्याच्या दुखापतीवर त्याचे उपचार सुरू आहेत आणि तो ही संपूर्ण कसोटी मालिका खेळू शकत नाही. सध्याच्या घडीला तो इंडियन प्रीमिअर लीगमधून पुनरागमन करण्याचा अंदाज आहे. विराट कोहली कधी परतणार याची उत्सुकता असताना त्याच्याबाबतची माहिती समोर येतेय... तो देशाबाहेर असल्याचे कळतेय. पण, लोकेश राहुल तिसऱ्या कसोटीतून पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरवींद्र जडेजाविराट कोहलीमोहम्मद शामी