IND vs ENG : विराट कोहलीची 'कसोटी'तील जागा युवा शिलेदार घेणार? BCCI ने केली संघात निवड 

India vs England ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेत २५ जानेवारीपासून सुरुवात होत आहे, परंतु त्याआधीच ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 11:21 AM2024-01-23T11:21:36+5:302024-01-23T11:22:08+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG : Rinku Singh has been added to the India 'A' squad for the second unofficial Test against England Lions | IND vs ENG : विराट कोहलीची 'कसोटी'तील जागा युवा शिलेदार घेणार? BCCI ने केली संघात निवड 

IND vs ENG : विराट कोहलीची 'कसोटी'तील जागा युवा शिलेदार घेणार? BCCI ने केली संघात निवड 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेत २५ जानेवारीपासून सुरुवात होत आहे, परंतु त्याआधीच यजमान भारताला धक्का बसला आहे. स्टार फलंदाज विराट कोहली याने पहिल्या दोन कसोटीतून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्याचे बीसीसीआयने जाहीर केले. लवकरच विराटची रिप्लेसमेंट जाहीर केले जाईल, असेही बीसीसीआयने त्यांच्या निवेदनात म्हटले होते. तेच आज बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यासाठी भारत अ संघ जाहीर केला. त्यात स्फोटक फलंदाज रिंकू सिंग ( Rinku Singh) याची निवड केली आहे. 


भारत अ संघाला २४ जानेवारीपासून इंग्लंड लायन्सविरुद्ध दुसरी अनधिकृत कसोटी खेळायची आहे. ४  दिवस चालणाऱ्या या कसोटीसाठी रिंकूला संघात स्थान मिळाले आहे. इंग्लंड लायन्स संघ भारत दौऱ्यावर आहे आणि ते तीन अनधिकृत कसोटी खेळणार आहेत. त्यापैकी पहिला सामना अनिर्णित राखला गेला होता. रिंकूची नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती. त्याने आतापर्यंत ४३ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये ५८.४७ च्या सरासरीने ३०९९ धावा केल्या आहेत.  

भारत आणि इंग्लंड यांच्यात २५ जानेवारीपासून ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विश्रांती घेतली आहे. अशा स्थितीत निवड समिती रिंकू सिंगवरही लक्ष ठेवून आहेत. रिंकूची प्रथम श्रेणीतील कामगिरी खूप चांगली आहे.  बोर्डाने अद्याप विराट कोहलीच्या बदलीची घोषणा केलेली नाही. भारत अ संघासाठी आश्चर्यकारक कामगिरी करणारे सर्फराज खान आणि रजत पाटीदार हे या शर्यतीत सध्या आघाडीवर आहेत. 

भारत अ संघ - अभिमन्यू इश्वरन ( कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सर्फराज खान, तिलक वर्मा, कुमार कुशाग्र, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, अर्शदीप सिंग, तुषार देशपांडे, विद्वाथ कावेरप्पा, उपेंद्र यादव, आकाश दीप, यश दयाल, रिंकू सिंग ( India ‘A’ squad for the 2nd multi-day match: Abhimanyu Easwaran (Captain), Sai Sudharsan, Rajat Patidar, Sarfaraz Khan, Tilak Varma, Kumar Kushagra, Washington Sundar, Sourabh Kumar, Arshdeep Singh, Tushar Deshpande, Vidwath Kaverappa, Upendra Yadav, Akash Deep, Yash Dayal, Rinku Singh) 
 

Web Title: IND vs ENG : Rinku Singh has been added to the India 'A' squad for the second unofficial Test against England Lions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.