India vs England, Oval Test: भारतीय संघानं ओव्हल कसोटीत इंग्लंडला १५७ धावांनी लोळवलं आणि ऐतिहासिक विजय साजरा केला. भारताला ओव्हलच्या मैदानात तब्बल ५० वर्षांनंतर कसोटी विजय साजरा करता आला आहे. त्यामुळे या विजयाचं महत्त्व किती आहे ते यातून लक्षात येतं. ज्यापद्धतीनं युवा भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात गाबा कसोटी कांगारुंचं गर्वाचं घर रिकामी केलं होतं. त्याचपद्धतीनं ओव्हलच्या विजयाकडे पाहायला हवं. कारण दोन्ही घटना भारतासाठी ऐतिहासिक ठरल्या आहेत. ओव्हल कसोटीत भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार कोण असा शोध सुरू झाला. खरंतर संघानं प्राप्त केलेला विजय हा सांघिक कामगिरीचं योगदान असतं. पण क्रिकेट एक खेळ आहे आणि यात सर्वोत्तम कामगिरीसाठी कुणाची तरी एकाची निवड करावी लागते. ज्याला आपण 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कारानं सन्मानित करतो. ओव्हल कसोटीत भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याची सामनावीराच्या पुरस्कारासाठी निवड झाली. (IND vs ENG: Rohit Sharma name Shardul Thakur most deserving for Player Of the match to win Oval Test)
भारताचा ऐतिहासिक विजय, शार्दुल ठाकूर ठरला गेम चेंजर!
रोहित शर्मानं दुसऱ्या डावात १२७ धावांची मोलाची खेळी साकारली. परदेशी मैदानात रोहित शर्माच्या फलंदाजीतून साकारलं गेलेलं हे पहिलंवहिलं शतक ठरलं. या डावात रोहितनं दुसऱ्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारासोबत १५३ धावांची भागीदारी रचली आणि संघाला सावरलं. त्यामुळेच सामनाधिकाऱ्यांनी रोहित शर्माची सामनावीराच्या पुरस्कारासाठी निवड केली.
रोहितनं म्हणाला शार्दुल ठाकूर खरा शिल्पकार
रोहित शर्मानं सामनावीराचा पुरस्कार स्वीकारला खरा पण त्यानं हा पुरस्कार स्वीकारतानंही अनेकांची मनं जिंकली आहेत. कारण त्यानं प्रांजळ मनानं या विजयाचं श्रेय भारतीय युवा गोलंदाज शार्दुल ठाकूर याला दिलं. त्यानं सर्वांसमक्ष खरा 'मॅच विनर' खेळाडू शार्दुल ठाकूर आहे आणि तोच या पुरस्काराचा खरा मानकरी आहे असं जाहीर केलं.
इंग्लंडच्या कर्णधाराला होता विजयाचा विश्वास, पण भारताच्या 'या' खेळाडूनं लावली वाट, Video
शार्दुल ठाकूरनं पहिल्या डाव्यात ३६ चेंडूत ५७ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात ७२ चेंडूत ६० धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीत दोन्ही डावात मिळून त्यानं इंग्लंडच्या ३ महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी धाडलं होतं. पहिल्या डावात शार्दुलनं मैदानात जम बसवलेल्या पोप याची विकेट घेतली. तर दुसऱ्या डावात रोरी बर्न्स आणि ज्यो रूट या दोन मोठ्या विकेट्स त्यानं मिळवल्या. अशापद्धतीनं ओव्हल कसोटीत शार्दुल ठाकूरनं अष्टपैलू कामगिरीचं दर्शन घडवलं. त्यामुळेच रोहित शर्मानं आपल्या सामनावीराच्या पुरस्काराचं श्रेय शार्दुल ठाकूर याला दिलं.
Web Title: IND vs ENG Rohit Sharma name Shardul Thakur most deserving for Player Of the match to win Oval Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.