इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत संजू सॅमसनवर सर्वांच्या नजरा असतील. कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानातून भारत-इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांचा मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत विकेट किपर बॅटर संजू सॅमसनला महेंद्रसिंह धोनीसह ३ दिग्गजांना मागे टाकण्याची संधी असेल. जाणून घेऊयात संजूला खुणावणाऱ्या खास रेकॉर्ड्सची गोष्ट
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण आफ्रिकेत धमाका; आता घरच्या मैदानावर कमाल करुन दाखवण्याची संधी
आयसीसी टी २० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांनी आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सातत्याने संजू सॅमसन भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना दिसतोय. सातत्याने मिळालेल्या संधीच त्याने सोनंही करून दाखवलं आहे. त्यामुळेच इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतही त्याच्याकडून दमदार खेळीची अपेक्षा आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात अनेक विक्रमांना गवसणी घातल्यावर आता घरच्या मैदानात पुन्हा त्याला खास कामगिरीची संधी आहे.
धोनी आणि रैनाला मागे टाकण्याची संधी
इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेत संजू सॅमसनला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत धवन, धोनी आणि रैनाला मागे टाकण्याची संधी आहे. धोनीनं आपल्या टी-२० कारकिर्दीत ९८ सामन्यात ५२ षटकार मारले आहेत. संजूनं ३७ सामन्यात आतापर्यंत ४६ षटकार मारले आहेत.
आधी धवनच्या विक्रमाला लागणार सुरुंग जर संजू सॅमसन याने या मालिकेत १२ षटकार मारले तर तो धनला मागे टाकेल. शिखर धवनने आपल्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ५० षटकार मारले आहेत. धवनला मागे टाकण्यासाठी संजूला तसा एक सामनाही पुरेसा ठरू शकतो. याशिवाय रैनालाही तो मागे टाकू शकतो. रैनानं आपल्या टी-२० कारकिर्दीत ५८ षटकार मारले आहेत.
आंतरारराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
रोहित शर्मा १५९ सामन्यात २०० पेक्षा अधिक षटकार मारले आहेत. या यादीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या स्थानावर आहे. ७८ सामन्यातील ७४ डावात विद्यमान भारतीय कर्णधारानं १४५ षटकार मारले आहेत. या यादीत विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने १२५ आंतरारष्ट्रीय टी-२० सामन्यात १२४ षटकार मारले आहेत. लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या अनुक्रमे ९९ आणि ८८ षटकारासह चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.