Join us

IND vs ENG : टीम इंडियाच्या वनडे संघातून पंत OUT; इथं पाहा माजी क्रिकेटरची प्लेइंग इलेव्हन

या माजी क्रिकेटरनं रिषभ पंतला टीम इंडियातून आउट केलं आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:12 IST

Open in App

IND vs ENG: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेआधी भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी माजी क्रिकेटर आणि क्रीडा समीक्षक, समालोचक संजय मांजरेकर याने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. विशेष म्हणजे या माजी क्रिकेटरनं रिषभ पंतला टीम इंडियातून आउट केलं आहे.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मांजरेकरांनी पंतऐवजी या खेळाडूला दिली पसंती

इंग्लंड विरुद्धच्या वनडेसाठी मांजरेकरांनी रिषभ पंतऐवजीलोकेश राहुलला पहिली पसंती दिली आहे. एवढेच नाही तर बॅकअपच्या रुपातही त्यांच्या नजरेत वनडे संघात पंत फिट होत नाही. त्यामुळेच त्यांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संजू सॅमसनसह बॅकअपच्या रुपात तर ध्रुव जुरेल याला पाचव्या क्रमांकावर संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्थान दिले आहे.

संजू-सरफराज राखीव खेळाडूंच्या यादीत

मांजरेकर याने स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात म्हटले आहे की, ध्रुव जुरेल हा कसोटीपटू आहे. पण वनडेत आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले तर त्याच्यासारखा खेळाडू संघात असणं गरजेचे असते. त्यामुळे संभाव्य संघात मी त्याला पाचव्या क्रमांकावर स्थान देईनं. पण पहिली पसंती ही लोकेश राहुलच असेल. संजू सॅमसनही चांगला खेळाडू आहे. भारतीय संघासाठी अखेरच्या १० षटकात त्याचा बेस्ट फिनिशरच्या रुपात वापर करता येऊ शकतो. 

सूर्यकुमार यादवपेक्षा श्रेयस अय्यर भारी

वनडे संघात सूर्यकुमार यादव हा योग्य पर्याय असला तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये तो फिट बसत नाही, ही गोष्टही संजय माजरेकर याने बोलून दाखवलीये. वनडेत बॅकअपच्या रुपात त्याचा विचार करेन, पण चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यरच सर्वोत्तम पर्याय वाटतो. त्याच्याशिवाय पाचव्या क्रमांकावर या माजी क्रिकेटरनं तिलक वर्माला पसंतीदिलीये. 

इंग्लंड विरुद्धच्या वनडेसाठी संजय मांजरेकरनं निवडलेली टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

शुबमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू: संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, सरफराज खान.

टॅग्स :भारत विरूद्ध इंग्लंड २०२५भारतीय क्रिकेट संघरिषभ पंतसंजू सॅमसनलोकेश राहुलभारत विरुद्ध इंग्लंड