Ind Vs Eng Semi Final: T20 विश्वचषक 2022 आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. 9 आणि 10 तारखेला उपांत्य सामना होणार असून, या दोन सामन्यातील विजयी संघांमध्ये अंतिम लढत होईल. भारताचा सामना इंग्लंडविरोधात असेल. या सामन्यांसाठी आयसीसीने पंच आणि इतर अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली आहेत. भारतीय चाहत्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे पंच रिचर्ड कॅटलबरो, हे टीम इंडियाच्या सामन्यात पंचाची जबाबदारी सांभाळणार नाहीत. यामुळे सोशल मीडियावर चाहते खूप खुश झाले आहेत. आयसीसीने सोमवारी उपांत्य फेरीतील सामन्यांसाठी अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना 10 नोव्हेंबर रोजी अॅडलेडमध्ये होणार आहे, ज्यामध्ये दोन ग्राउंड अंपायर, एक थर्ड अंपायर आणि मॅच रेफरी यांच्याबाबत आयसीसीने माहिती दिली आहे.
• फील्ड अंपायर: कुमार धर्मसेना आणि पॉल रीफेल• थर्ड अंपायर: ख्रिस गॅफनी• चौथा अंपायर: रॉड टकर• मॅच रेफरी: डेव्हिड बूनरिचर्ड कॅटलबरोशी काय संबंध आहे?रिचर्ड कॅटलबरोशी यांची या सामन्यात पंच म्हणून निवड न केल्यामुळए सोशल मीडियावर नेटकरी विविध मीम्स शेअर करत आहेत. याचे कारण म्हणजे, गेल्या काही आयसीसी इव्हेंटमध्ये जेव्हा-जेव्हा रिचर्ड कॅटलबरो भारताच्या मॅचमध्ये फील्ड अंपायर बनले आहेत, तेव्हा टीम इंडियाच्या बाबतीत काहीतरी वाईट घडले आहे. 2021 चा टी20 विश्वचषक असो किंवा 2019 साली न्यूझीलंडविरुद्ध भारताचा उपांत्य सामना असो. या सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला आहे. केवळ हे दोन सामनेच नाही, तर अशी अनेक उदाहरणे आहेत, जिथे रिचर्ड कॅटलबरो हे भारतासाठी अशुभ ठरले आहेत. यामध्ये 2014 T20 विश्वचषक, 2015 एकदिवसीय विश्वचषक, 2016 T20 विश्वचषक, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीचे बाद सामने, यांचा यात समावेश आहे. त्यामुळेच आता भारताच्या सामन्यासाठी रिचर्ड कॅटलबरो यांची नियुक्ती न झाल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
• न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - 9 नोव्हेंबर, सिडनी (दुपारी 1.30)• भारत विरुद्ध इंग्लंड - 10 नोव्हेंबर, अॅडलेड (दुपारी 1.30)