IND vs ENG Test Series ( Marathi News ) : भारत-इंग्लंड यांच्यातली कसोटी मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. इंग्लंड संघाला २०१२ पासून भारतीय भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. इंग्लंड संघाला १० वर्षांचा हा दुष्काळ संपवायचा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण १३१ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने ३१ सामने, इंग्लंडने ५० सामने जिंकले आहेत. ५० सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय खेळपट्टींमधील हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारताने ६४ पैकी २२ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडला १४ कसोटी जिंकल्या आहेत. पण, यंदाची मालिका भारतासाठी खडतर म्हणावी लागेल.
विराटची माघार अन् त्यात IND vs ENG कसोटी मालिकेसाठी KL Rahul बाबत द्रविडचा मोठा निर्णय
विराट कोहलीने मालिकेला सुरुवात होण्याच्या ३ दिवस आधीच वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. त्यामुळे त्याची रिप्लेसमेंट कोण असेल, अशी चर्चा सुरू आहे. सध्या रजत पाटीदार व सर्फराज खान ही दोन नावं समोर येत आहेत. दोघांनी स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली आहे. विराटच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांच्यावरील जबाबदारी वाढणार हे निश्चित आहे. हेच लक्षात घेऊन लोकेशला या मालिकेत यष्टिरक्षकाची भूमिका न देण्याचा निर्णय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने जाहीर केला.
सर्व काही सेट आहे असे वाटत असताना आज सराव सत्रात भारताच्या मधल्या फळीतील स्टार फलंदाजाला जखम झाली. श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) याच्या डाव्या मनगटावर जोरदार चेंडू आदळला. थ्रो डाऊनने टाकलेला चेंडू हा इतक्या वेगाने मनगटावर लागला की श्रेयसने त्वरीत बॅट तिथेच टाकली. वेदनेनं तो कळवळत होता आणि वैद्यकिय टीमची धावपळ सुरू झाली... त्याने तरीही फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु १ चेंडूचा सामना केल्यानंतर तो डग आऊटमध्ये जाऊन बसला. यावेळी वैद्यकिय टीमने त्याच्या हातावर आईस पॅक ठेवला...
श्रेयसलाही दुखापतीमुळे कसोटी मालिका खेळता न आल्यास भारताची डोकेदुखी वाढू शकते. श्रेयसने १२ कसोटीत १ शतक व ५ अर्धशतकांसह ७०७ धावा केल्या आहेत. जवळपास अर्धातास बाहेर बसल्यानंतर श्रेयस पुन्हा फलंदाजीला आल्याने संघ व्यवस्थापनाच्या चेहऱ्यावर आनंद परतला.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.
Web Title: IND vs ENG : Shreyas Iyer got hit on his right wrist while taking throwdowns. He tried to bat again but after facing one ball, he walked out of the nets. He was seen applying ice pack
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.