Ind Vs Eng: सेमिफायनलमध्ये संघाबाहेर बसला, पण दिनेश कार्तिकने त्या कृतीने जिंकलं मन, फोटो होतोय व्हायरल

T20 World Cup 2022, Ind Vs Eng: टी-२० वर्ल्डकपच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडचे संघ आमने-सामने आलेले आहेत. या सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या संघात बदल केलेला नाही. त्यामुळे या सामन्यासाठी रिषभ पंतला पुन्हा एकदा संघात संधी मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 02:48 PM2022-11-10T14:48:53+5:302022-11-10T14:51:08+5:30

whatsapp join usJoin us
Ind Vs Eng: Sits out of team in semi-final, but Dinesh Karthik wins hearts with that act, photo goes viral | Ind Vs Eng: सेमिफायनलमध्ये संघाबाहेर बसला, पण दिनेश कार्तिकने त्या कृतीने जिंकलं मन, फोटो होतोय व्हायरल

Ind Vs Eng: सेमिफायनलमध्ये संघाबाहेर बसला, पण दिनेश कार्तिकने त्या कृतीने जिंकलं मन, फोटो होतोय व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टी-२० वर्ल्डकपच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडचे संघ आमने-सामने आलेले आहेत. या सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या संघात बदल केलेला नाही. त्यामुळे या सामन्यासाठी रिषभ पंतला पुन्हा एकदा संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकला संघाबाहेर राहावे लागले आहे. मात्र दिनेश कार्तिकचा सामन्यापूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तसंच त्याच्या या कृतीचं कौतुक होत आहे.

दिनेश कार्तिकला अंतिम संघात स्थान मिळाले नसले तरी संघाप्रति असलेल्या त्याच्या समर्पणाच्या भावनेमध्ये कुठलीही कमतरता आलेली नाही. सामन्यापूर्वी दिनेश कार्तिकने ऋषभ पंतकडून भरपूर कॅचिंग प्रॅक्टिस करवून घेतली. दिनेश कार्तिकच्या या कृतीने सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे. सोशल मीडियावर हा फोटो आता व्हायरल होत आहे.  

या वर्ल्डकपमध्ये दिनेश कार्तिकला चांगली कामगिरी करता आलेली नाही. खेळलेल्या सर्व सामन्यांत मिळून त्याला केवळ १४ धावाच काढता आल्या होत्या. दरम्यान, निवड समितीने २०२४ चा टी-२० वर्ल्डकप डोळ्यांसमोर ठेवून तयारी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ३७ वर्षीय कार्तिकला न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही.  

Web Title: Ind Vs Eng: Sits out of team in semi-final, but Dinesh Karthik wins hearts with that act, photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.