IND vs ENG, T20 Series : भारत-इंग्लंड यांच्यातल्या ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेला १२ मार्चपासून सुरूवात होणार आहे. अहमबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) पाचही सामने होणार आहेत. भारतीय संघानं कसोटी मालिका ३-१ अशी जिंकून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( ICC World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीनं इंग्लंडविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका ही भारतासाठी महत्त्वाची आहे. या मालिकेतील कामगिरीच्या जोरावरच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठीचा ( ICC T20 World Cup ) संघ ठरणार आहे. भारत-इंग्लंड सामने, आयपीएल २०२१ फायनलपाठोपाठ नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप!
या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच आयसीसीन टीम इंडियाला भारी बातमी दिली आहे. आयसीसीनं बुधवारी जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० क्रमवारीत ( ICC T20I Rankings ) टीम इंडियान दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवून इंग्लंडकडून अव्वल स्थानही हिस्कावून घेण्याची संधी विराट कोहलीच्या सेनेला आहे. भारतानं ही मालिका ४-१ किंवा ५-० अशी जिंकल्यास अव्वल स्थान त्यांचे होईल. भारतीय संघ कसोटीत अव्वल स्थानावर आहे, तर वन डे त दुसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडिया ट्वेंटी-20 मालिकेत कोणत्या जर्सीत दिसणार?; खेळाडूंनी पोस्ट केले फोटो
भारतीय संघ २६८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंडच्या खात्यात २७५ गुण आहेत. ऑस्ट्रेलिया ( २६७), पाकिस्तान ( २६०) आणि न्यूझीलंड ( २५३) टॉप फाईव्हमध्ये आहेत. फलंदाजांच्या क्रमवारीत मात्र लोकेश राहुलला ( KL Rahul) फटका बसला आहे. त्याची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच दोन स्थानांच्या सुधारणेसह दुसऱ्या स्थानी आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत फिंचनं दमदार कामगिरी केली. इंग्लंडचा डेवीड मलान ( ९१५) अव्वल स्थानावर आहे. पत्नी सागरिकासह झारखंडच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचला झहीर खान, घेतला आशिर्वाद गोलंदाजांमध्ये ट्वेंटी-20 क्रमवारीत टॉप टेनमध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही. ऑस्ट्रेलियाच्या अॅश्टन अॅगरन चार स्थानांची झेप घेताना चौथ्या क्रमांकावर आला आहे.