IND vs ENG, T20 Series : भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड दौऱ्याची मालिका दुसऱ्या टप्प्यात आली आहे. इंग्लंडचा संघ कसोटी मालिकेतील पराभवाचा वचपा पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेतून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. १२ मार्चपासून ट्वेंटी-20 मालिकेला सुरूवात होणार आहे. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघाला मागील तीन सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीच्या टीमकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे इंग्लंडची येथेही कसोटी लागणार. ( schedule, squads, fixtures, telecast and streaming details of the five T20Is ). या मालिकेत टीम इंडियाचे खेळाडू पुन्हा रेट्रो जर्सीत दिसणार आहेत. ( India will be playing the T20i series against England in the retro jersey) ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही टीम इंडिया याच जर्सीत मैदानावर उतरले होती. भारत-इंग्लंड सामने, आयपीएल २०२१ फायनलपाठोपाठ नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार ट्वेंटी-२० वर्ल्ड कप!
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Ahmedabad's Narendra Modi Stadium) हे पाचही सामने खेळवण्या येणार आहेत. १२, १४, १६, १८ आणि २० मार्चला हे सामने खेळवण्यात येतील. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजल्यापासून सामन्यांचे प्रक्षेपण सुरू होईल. पत्नी सागरिकासह झारखंडच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचला झहीर खान, घेतला आशिर्वाद
दोन्ही संघ भारत - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
इंग्लंड - इयॉन मॉर्गन, मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलींग, जोस बटलर, सॅम कुरन, टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन, लाएम प्लंकेट, डेवीड मलान, आदील रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिसे टॉप्ली, मार्क वूड, जॅक बॉल, मॅट पर्किसन