India vs England 1st T20 : कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडिया ट्वेंटी-20 मालिकेत इंग्लंडचा सुफडा साफ करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. पण, भारतीय संघासमोर अडचणी वाढत चालल्या आहेत. India Playing XI for 1st T20 आयपीएल २०२० गाजवल्यानंतर टीम इंडियाकडून ट्वेंटी-20 संघात स्थान पटकावणाऱ्या टी नटराजनचे ( T Natarajan) या मालिकेत खेळणे, धोक्यात आले आहे. दुखापतीमुळे सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) पुनर्वसनासाठी गेला होता. पण, तो अजूनही तंदुरूस्त झालेला नाही. त्यात वरूण चक्रवर्थी ( Varun Chakravarty) आणि राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) हे दोघेही BCCIच्या तंदुरूस्त चाचणीत नापास झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 मालिकेसाठी टीम इंडिया मुंबई इंडियन्सचा गोलंदाज राहुल चहर ( Rahul Chahar) याचा संघात समावेश करणार असल्याची शक्यता आहे. 'ये तो बिल्कुल नही बदला यार'; सचिन अन् युवराजची विकेट घेतल्यानंतर चर्चेत आला माँटी पानेसर
वरुण चक्रवर्थी सलग दुसऱ्यांदा तंदुरूस्तीच्या चाचणीत अपयशी ठरला आहे. यापूर्वी २९वर्षीय गोलंदाजाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेसाठी निवड झाली होती, परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली. आयपीएल २०२०मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून त्यानं सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. वरुण NCAत बराच काळ होता आणि इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठीच्या संघात त्याची निवड करण्यात आली. पण, BCCI च्या यो-यो चाचणीत व दोन किलोमीटर धावण्याच्या परीक्षेत तो नापास झाला. ( Varun Chakravarty fails fitness test ) महेंद्रसिंग धोनीनं सुरू केला IPL 2021साठी सराव, नेट्समध्ये हॅलिकॉप्टर शॉट्सची फटकेबाजी
टी नटराजन हाही पूर्णपणे तंदुरूस्त झालेला नाही. त्याच्या गुडघ्याला व खांद्याला दुखापत झाली आहे आणि तो १२ मार्चच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमीच आहे. २९ वर्षीय नटराजननं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. त्यानं ट्वेंटी-२० मालिकेत सहा विकेट्स घेतल्या होत्या. Ind vs Eng 1st T20 – T Natarajan still rehablitating NCAच्या अधिकाऱ्यानं ANIला सांगितले की, त्याच्या गुडघ्याला व खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे ट्वेंटी-२० मालिकेत त्याचे खेळणे अनिश्चित आहे. केव्हीन पीटरसनच्या वादळी खेळीला इरफान पठाणचे सडेतोड उत्तर, मनप्रीत गोनीच्या फटकेबाजीनं इंग्लंडचे गोलंदाज निरूत्तर
राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू राहुल टेवाटिया हाही तंदुरूस्त चाचणीत अपयशी ठरला आणि तोही सध्या NCAत सराव करत आहे. त्याचेही ट्वेंटी-२० मालिकेत खेळणे अनिश्चित वाटत आहे. अशात मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू राहुल चहर ( Rahul Chahar) याला चक्रवर्थीच्या जागी ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या संघात स्थान मिळू शकते.
भारत ( India’s T20I squad ) - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर