India vs England : 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटीतून कर्णधार रोहित शर्माने माघार घेतली आहे. Rohit Sharma चा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याच्या नेतृत्वाखाली बेन स्टोक्सच्या इंग्लंडचा सामना करण्यासाठी टीम इंडिया मैदानानवर उतरणार आहे. कपिल देव यांच्यानंतर जवळपास 35 वर्षांनी इंग्लंडमध्ये जलदगती गोलंदाज भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. 1 ते 5 जुलै या कालावधीत ही कसोटी होणार आहे आणि 7 जुलैपासून ट्वेंटी-20 मालिका सुरू होणार आहे. या मालिकेच्या बाबतीतही मोठी अपडेट्स समोर आली आहे.
तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ मैदानावर उतरणार आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताने आयर्लंडविरुद्धची मालिका 2-0 अशी जिंकली आणि तोच संघ इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळणार आहे. रोहित शर्मा तो पर्यंत जर तंदुरुस्त झाला, तर तो पहिल्या ट्वेंटी-20त नेतृत्व करू शकतो.
भारत-इंग्लंड मालिकेतील महत्तवाचे मुद्दे
- रोहित शर्मा याचा दुसरा RT-PCR अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीत जसप्रीत बुमराहकडे संघाचे नेतृत्व असेल
- मयांक अग्रवाल याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळणे अवघड आहे. चेतेश्वर पुजारा व शुबमन गिल ही जोडी सलामीला खेळण्याची शक्यता बळावली आहे.
- आयर्लंडविरुद्धचाच ट्वेंटी-20 संघ इंग्लंडविरुद्ध पहिल्या ट्वेंटी-20त खेळणार. त्यानंतर दुसऱ्या ट्वेंटी-20साठी कोहली, रोहित, जसप्रीत उपलब्ध असणार आहेत.
भारतीय संघ - हार्दिक पांड्या ( कर्णधार), भुवनेश्वर कुमार( उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सुर्यकुमार यादव, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्षदीप सिंग, उमरान मलिक.
ट्वेंटी-२० मालिका
पहिला सामना - ७ जुलै २०२२, एजीस बॉलदुसरा सामना - ९ जुलै २०२२, एडबस्टनतिसरा सामना - १० जुलै २०२२, ट्रेंट ब्रिज वन डे मालिका
पहिला सामना - १२ जुलै २०२२, ओव्हलदुसरा सामना - १४ जुलै २०२२, लॉर्ड्सतिसरा सामना - १७ जुलै २०२२- ओल्ड ट्रॅफर्ड