India vs England:इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताला 7 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. भारताच्या पराभवानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी आता सोशल मीडियावर दिसत असून, टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
पराभवासाठी द्रविड जबाबदार?एजबॅस्टन कसोटीत टीम इंडियाचा 7 विकेट्सनी पराभव झाला. या सामन्यात टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंची कामगिरी खराब राहिली. त्यामुळे भारतीय संघाचे सामना जिंकणयाचे स्वप्न भंगले. पण लोकांनी खेळाडूंऐवजी प्रशिक्षक राहुल द्रविडवर राग काढला. द्रविड जेव्हापासून संघाचा प्रशिक्षक झाला, तेव्हापासून संघ मोठ्या सामन्यांमध्ये अपयशी ठरत आहे, असे लोकांनी म्हटले. अनेकांनी द्रविडला प्रशिक्षकपदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
राहुल द्रविड जेव्हापासून टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला तेव्हापासून भारतीय संघाचे वाईट दिवस सुरू झाले हेही खरे आहे. द्रविडच्या काळात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर इंग्लंडमध्येही विजय मिळवता आलेला नाही. त्याचबरोबर मर्यादित षटकांच्या मालिकेतील मोठ्या सामन्यांमध्ये टीम इंडियाची कामगिरीही खराब राहिली आहे. अशा स्थितीत आगामी टी-20 विश्वचषक आणि त्यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या वनडे विश्वचषकापूर्वी संघासाठी चिंतेची बाब आहे.
भारतीय संघाचा लाजिरवाणा पराभवएजबॅस्टन कसोटीत टीम इंडियाचा 7 विकेट्सनी पराभव झाला. टीम इंडियाने इंग्लंडसमोर हा सामना जिंकण्यासाठी 378 धावांचं लक्ष्य दिलं होतं. इंग्लंडने हे लक्ष्य केवळ 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी शतके झळकावली. जो रूटने नाबाद 142 आणि जॉनी बेअरस्टोने नाबाद 114 धावा केल्या.