Join us  

IND vs ENG : विराटसेना मालिका विजयाचा षटकार मारणार का?

जानेवारी 2017 ला स्थानिक मालिकेत भारताने 0-1ने माघारल्यानंतरही इंग्लंडला 2-1 ने पराभूत केले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 4:06 PM

Open in App

ब्रिस्टल : भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान टी-२० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज रंगणार आहे.  मालिकेत दोन्ही संघानी प्रत्येकी एक-एक विजय मिळवला आहे. आज होणाऱ्या निर्णायक सामन्यात दोन्ही संघाचा विजयावर डोळा असेल.  विराट कोहलीच्या नेत्वृतील भारतीय संघाने ऑगस्ट 2016 पासून एकाही टी-20 मालिकेत पराभव पाहिला नाही.  एका सामन्यापेक्षा आधिक सामने असलेल्या मालिकेत भारताने ऑगस्ट 2016 मध्ये वेस्ट इंडिजकडून पराभव पाहिला होता. तेव्हापासून विराटसेना अपाराजित आहे. जानेवारी 2017 ला स्थानिक मालिकेत भारताने 0-1ने माघारल्यानंतरही इंग्लंडला 2-1 ने पराभूत केले होते

ब्रिस्टलमध्ये झालेल्या तिनही वन-डे सामन्यात भारताने आतापर्यंत विजय मिळावला आहे. पण येथे भारत पहिलाच टी-20 सामना खेळत आहे. येथे झालेले दोन्ही टी20 सामने इंग्लडे गमावले आहेत. आतापर्यंत भारताने तीन सामन्याची टी-20 मालिका कधीच गमावलेली नाही. आजतागत भारताने सात मालिका खेळल्या आहेत. या सातही मालिकेत भारतीय संघाने बाजी मारली आहे.  

मॅनचेस्टरमध्ये झालेल्या पराभवानंतर यजमान फलंदाजांनी कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांच्या फिरकीचा अभ्यास केला आणि दुस-या सामन्यात यशस्वीपणे तोंड दिले.  या दोघांना प्रतिस्पर्धी फलंदाजांना जाळ्यात ओढण्याचे तंत्र नव्याने शोधावे लागेल. कालच्या सामन्यात अखेरच्या षटकांत जसप्रीत बुमराह याची उणीव जाणवली.

दोन्ही संघ -  भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, कुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल आणि उमेश यादव.

इंग्लंड : इयोन मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जानी बेयरस्टो, जॅक बॉल, जोस बटलर, सॅम कुर्रान, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, लियॉम प्लंकेट, आदिल राशिद, ज्यो रूट, जेसन रॉय, डेव्हिड विली, डेव्हिड मलान आणि बेन स्टोक्स.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहली