IND vs ENG : टीम इंडिया दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात; भारतीय दिग्गजाला वाहिली श्रद्धांजली

 ICC ODI World Cup 2023 : आज वन डे विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 02:20 PM2023-10-29T14:20:59+5:302023-10-29T14:21:27+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG Team India will be wearing Black Armbands in memory of the legendary Bishan Singh Bedi before the start of play against England in the ICC Men's Cricket World Cup 2023  | IND vs ENG : टीम इंडिया दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात; भारतीय दिग्गजाला वाहिली श्रद्धांजली

IND vs ENG : टीम इंडिया दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात; भारतीय दिग्गजाला वाहिली श्रद्धांजली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लखनौ : वन डे विश्वचषकात आज भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे. भारताविरुद्धच्या सामन्यासाठी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्हीही कर्णधारांनी आपल्या संघात एकही बदल केला नाही. दरम्यान, भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता, कारण आव्हानाचा पाठलाग करताना संघाने चांगली कामगिरी केली आहे. लक्षणीय बाब म्हणजे आजच्या सामन्यात भारतीय शिलेदार दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत. भारतीय दिग्गज बिशनसिंग बेदी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतीय खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधली. आपल्या फिरकीने भल्याभल्यांना घाम फोडणारे भारताचे माजी खेळाडू महान क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक अविस्मरणीय सामन्यांद्वारे चाहत्यांना क्रिकेटचा आनंद दिला. १९६७ ते १९७९ या कालावधीत त्यांनी भारताचे ६७ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले आणि २६६ बळी घेतले. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज. 

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बेदी प्रथम उत्तर पंजाबसाठी खेळले, जेव्हा ते फक्त पंधरा वर्षांचे होते आणि १९६८-६९ मध्ये ते दिल्लीला गेले आणि १९७४-७५च्या रणजी करंडक स्पर्धा त्यांनी गाजवलीव ६४ बळी घेतले. बेदी यांनी अनेक वर्षे इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५६० बळींसह आपली कारकिर्द पूर्ण केली.   

 बिशन बेदी यांचे भारतासाठी योगदान - 
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया १९६९-७० : २०.५७ च्या सरासरीने २१ बळी
भारत विरुद्ध इंग्लंड १९७२-७३: २५.२८ च्या सरासरीने २५ बळी 
वेस्ट इंडिजमध्ये १९७५-१९७६  : २५.३३ च्या सरासरीने १८ बळी 
भारत विरूद्ध न्यूझीलंड १९७६–७७: १३.१८च्या सरासरीने २२ बळी
भारत विरुद्ध इंग्लंड १९७६–७७ : २२.९६ च्या सरासरीने २५ बळी 
ऑस्ट्रेलियामध्ये १९७७–७८ : २३.८७ च्या सरासरीने ३१ बळी 

Web Title: IND vs ENG Team India will be wearing Black Armbands in memory of the legendary Bishan Singh Bedi before the start of play against England in the ICC Men's Cricket World Cup 2023 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.