इंग्लंडच्या खांद्यावरून टीम इंडियानं साधला पाकच्या विक्रमावर निशाणा; इथं जाणून घ्या तो खास रेकॉर्ड

ईडन गार्डन्सच्या मैदानातील टीम इंडियाच्या या विजयानंतर 'सत्ते पे सत्ता' असा खास सीन पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:39 IST2025-01-23T18:34:23+5:302025-01-23T18:39:06+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG Team India Won 7 Consecutive Matches At Eden Gardens And Equals Pakistan's T20I Record England Top In This List | इंग्लंडच्या खांद्यावरून टीम इंडियानं साधला पाकच्या विक्रमावर निशाणा; इथं जाणून घ्या तो खास रेकॉर्ड

इंग्लंडच्या खांद्यावरून टीम इंडियानं साधला पाकच्या विक्रमावर निशाणा; इथं जाणून घ्या तो खास रेकॉर्ड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेतील पहिला सामना ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघानं पाहुण्या इंग्लंड संघाला ७ विकेट्स राखून पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानातील टीम इंडियाच्या या विजयानंतर 'सत्ते पे सत्ता' असा खास सीन पाहायला मिळाला. अर्थात भारतीय संघाने ७ विकेट्स राखून सामना जिंकत कोलकाताच्या मैदानात सलग सातवा टी-२० सामना जिंकला आहे. यासह टीम इंडियानं पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारतीय संघानं क्रिएट केली वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी

एका मैदानात सलग सर्वाधिक सामने जिंकण्याच्या वर्ल्ड रेकॉर्ड हा इंग्लंड संघाच्या नावे आहे. २०१० ते २०२१ या कालावधी इंग्लंडच्या संघानं कार्डिफच्या मैदानात सलग ८ टी-२० सामने जिंकण्याचा विक्रम नोंदवला आहे. भारतीय संघाला हा विक्रम मोडण्याची संधी आहे. कारण आता भारताच्या नावे कोलकाताच्या मैदानात सलग ७ विजय नोंदवण्याचा विक्रमाची नोंद झालीये. या मैदानातील आणखी एक विजय भारतीय संघाला वर्ल्ड रेकॉर्डच्या विक्रमाशी बरोबरी करुन देणारा ठरेल.   

इंग्लंडच्या खांद्यावरून टीम इंडियाचा पाकच्या विक्रमावर निशाणा

२०१६ पासून आतापर्यंत ई़डन गार्डन्सच्या मैदानात सलग सातव्या टी-२० सामन्यातील विजयासह भारतीय संघानं पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पाकिस्तानच्या संघानं २००८ ते २०२१ या कालावधीत कराचीच्या मैदानात ७ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने जिंकल्याचा रेकॉर्ड आहे. भारतीय संघानं २०१६ ते २०२५ या कालावधीत कोलकाताच्या मैदानात ७ टी-२० सामने जिंकत नवा रेकॉर्ड सेट केलाय. 

७ षटके अन् ७ विकेट्स राखून जिंकला सामना

ईडन गार्डन्सच्या मैदानात पहिल्यांदा बॅटिंग करताना इंग्लंडच्या संघानं निर्धारित २० षटकात १३२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने १२.५ षटकात विजय निश्चित केला. भारतीय संघानं ७ षटके आणि ७ विकेट राखून हा सामना खिशात घातला. अभिषेक वर्मानं या सामन्यात तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. पण गोलंदाजी हवा करणाऱ्या वरुण चक्रवर्तीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. 

 

Web Title: IND vs ENG Team India Won 7 Consecutive Matches At Eden Gardens And Equals Pakistan's T20I Record England Top In This List

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.