IND Vs ENG Test, SarfarazKhan: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना आजपासून (१५ फेब्रुवारी) राजकोटमध्ये सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय संघात चार बदल करण्यात आले आहेत. सर्फराज व जुरेल यांचे पदार्पण झाले आहेत. जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजा यांचे पुनरागमन झाले आहे. मुकेश कुमार व अक्षर पटेल यांना विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी सर्फराज खानला पदार्पणाची कॅप दिली. तर दिनेश कार्तिकने यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलला पदार्पणाची कॅप दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून सर्फराजला संधी देण्यावरुन चर्चा रंगली होती. आज त्याला कसोटीत पदार्पणाची संधी देण्यात आली. यावेळी राजकोटच्या मैदानात अनेकजण भावून झाल्याचे दिसून आले. अनिल कुंबळेंनी जेव्हा सर्फरालजा कसोटी पदार्पणाची कॅप दिली गेली, तेव्हा शेजारीच उपस्थित असलेले त्याचे वडील आणि पत्नी ढसाढसा रडले. यावेळी सर्फराजने पत्नीचे अश्रू पुसले व वडिलांना मिठी मारली. या क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा क्षण पाहून सर्व भारतीय देखील गहिवरल्याचे दिसून आले.
कोण आहे सर्फराज खान?
सर्फराजने आयपीएलमध्येही आपली ताकद दाखवली, वयाच्या १७ व्या वर्षी सर्फराज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला. आयपीएल सामन्यात सहभागी होणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने दबदबा राखला आहे. त्याने ४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांत ६२९ धावा आणि ट्वेंटी-२०त ९६ सामन्यांत ११८८ धावा केल्या आहेत.
भारतीय संघ - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आऱ अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रजत पाटीदार, मोहम्मद सिराज
इंग्लंडचा संघ - झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड व जेम्स अँडरसन.