India vs England Test Series: परिस्थिती कोणतिही असो आक्रमक क्रिकेट खेळण्याचा निर्धार श्रेयस अय्यर व्यक्त केला आहे. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी भारतीय फलंदाज तब्बल पाच वर्षानंतर रणजी करंडक स्पर्धेत खेळण्यासाठी परतला आहे. आंध्रप्रदेशविरुद्धच्या लढतीत श्रेयसने ४८ धावांची आक्रमक खेळी केली आणि मुंबईने हा सामना १० विकेट्सने जिंकला.
पहिल्या दिवशी अय्यरने मिळालेल्या एकमेव संधीत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि आंध्रच्या वेगवान गोलंदाजांना झोडून काढले. आंध्रच्या गोलंदाजांनी राऊंड दी विकेट आणि शॉर्ट चेंडू टाकून श्रेयसला घेरण्याचा प्रयत्न केला, परंतु मुंबईच्या फलंदाजाने त्याची पर्वा न करताना आक्रमक खेळ केला. अय्यरने पूर्ण चेंडू फ्लिक केले, शॉर्ट्स खेचले आणि लेग साइडवर त्याच्या तब्बल ७५ टक्के धावा केल्या आणि त्याच्या सात चौकारांपैकी फक्त एकच चेंडू ऑफ साइडला मारला.
मुंबईच्या विजयानंतर तो म्हणाला, ‘‘परिस्थिती कशीही असली तरी मी आक्रमक खेळ करणार आहे. ते बचावात्मक गोलंदाजी करत होते आणि त्यांनी मला माझ्या ताकदीनुसार खेळू दिले नाही. जरी त्यांनी आखूड चेंडूंनी सुरुवात केली. तरी मी चौकार खेचून धावा काढल्या. पुन्हा, ते निगेटिव्ह बॉलिंग करत होते त्यामुळे अक्षरशः काही वाव नव्हता. बॉल सोडण्याशिवाय मी फार काही करू शकत नव्हतो. मला माहित होते की बॉल सोडल्याने मला कंटाळा येईल. मी त्याऐवजी जाऊन काही स्ट्रोक खेळू इच्छितो. त्या वेळी मी याचाच विचार केला होता.''
वन डे व ट्वेंटी-२०त त्याच्या स्ट्राईक रेट हा अनुक्रमे १०१.२७ व १३६.१२ असा आहे आणि यावरूनच त्याला आक्रमक खेळ करायला आवडतो हे दिसते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्याने हाच पवित्रा वापरला आहे आणि त्याने ७८.६३च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केलीय. पण, कसोटीत त्याचा स्ट्राईक रेट ६५.३४ असा खाली आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अय्यर महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. अय्यरने १२ कसोटी सामने खेळले आहेत. २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने पदार्पण केले आणि त्यात १ शतक व १ अर्धशतक झळकावले. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, केएस भरत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, आवेश खान.