टीम इंडिया घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. भारतीय संघाने आतापर्यंत आपला दबदबा कायम ठेवून मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण, भारतीय संघासाठी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत मजबूत स्थितीत पोहोचण्यासाठी अखेरचा अर्थात पाचवा सामना महत्त्वाचा आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना ७ मार्चपासून धर्मशालाच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासोबत विमानतळावर एक नाट्यमय घडामोड घडली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय कर्णधार विमानतळावर स्पॉट झाला असता उपस्थित पापाराझींनी त्याच्याकडे फोटोसाठी आग्रह धरला.
यादरम्यान एक फोटोग्राफर म्हणाला की, रोहित सर आता रागावतील. असे म्हणत तो फोटोग्राफर रोहित शर्माला सॉरी म्हणू लागला. मात्र, रोहितनेही हसतमुखाने त्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि फोटो क्लिक केल्यानंतर तो पुढील प्रवासासाठी गेला. रोहित शर्माला पाहून फोटोग्राफर्सची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर एक फोटोग्राफर रोहितसोबत फोटो काढण्यासाठी गेला असता त्याची स्टाईल पाहून रोहितही अवाक् झाला.
पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटिदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, केएस भरत, देवदत्त पडिक्कल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.