India vs England : टीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे. पण, या सामन्यापूर्वी प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) वैयक्तिक कारणास्तव BCCI कडे रजा मागितली होती आणि चौथ्या कसोटीपूर्वी BCCIनं त्याला रिलीज केलं. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली असताना त्यानंतर होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत वरूण चक्रवर्थीची ( Varun Chakravarthy) पदार्पणाची संधी पुन्हा एकदा हुकण्याचे संकेत मिळत आहेत. बीसीसीआयच्या फिटनेस टेस्टमध्ये ( Fitness Test) कोलकाता नाइट रायडर्सचा ( KKR) फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्थी हा अपयशी ठरला आणि त्यामुळे ट्वेंटी-२० संघातून त्याला वगळले जाऊ शकते, असे वृत्त Cricbuzz नं दिले आहे.
बीसीसीआयच्या नियमानुसार खेळाडूनं नवीन २ किलोमीटर धावण्याची टेस्ट पास करावी किंवा यो-यो टेस्टमध्ये १७.१ गुणांची कमाई करावी. इशान किशन, संजू सॅमसन, जयदेव उनाडकट, सिद्धार्थ कौल आणि अन्य खेळाडूंची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस टेस्ट घेतली गेली. त्यापैकी केवळ किशनची इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी निवड झाली. चक्रवर्थी हा अजूनही टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघाचा सदस्य आहे, बीसीसीआयकडून अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. २०१७-१८मध्ये बीसीसीआयनं अंबाती रायुडू, मोहम्मद शमी, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांना यो-यो कसोटीत अपयशी ठरल्यानंतर संघातून वगळण्यात आळे होते. रायुडू, रैना आमइ शमी यांनी त्यानंतर पुन्हा झालेल्या यो-यो टेस्ट पास करून संघात पुनरागमन केले.
कधी व कुठे होणार ट्वेंटी-२० मालिकाभारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका अहमदाबाद येथे होणार आहे. १२, १४, १६, १८ आणि २० मार्चला हे सामने होतील. त्यानंतर तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी संघ पुण्यासाठी रवाना होईल. २३ , २६ आणि २८ मार्चला वन डे सामने होतील.