India vs England : विराट कोहलीचा 'Shadow' हेलिकॉप्टर शॉट पाहिलात का?; नसेल तर हा Video पाहाच

India vs England, 1st Test : तीनही कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी सोमवारपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सरावाला सुरुवात केली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 2, 2021 05:34 PM2021-02-02T17:34:18+5:302021-02-02T17:41:27+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG : Virat Kohli trying shadow Helicopter shot during the outdoor practice session, Video | India vs England : विराट कोहलीचा 'Shadow' हेलिकॉप्टर शॉट पाहिलात का?; नसेल तर हा Video पाहाच

India vs England : विराट कोहलीचा 'Shadow' हेलिकॉप्टर शॉट पाहिलात का?; नसेल तर हा Video पाहाच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या दृष्टीनं ही मालिका महत्त्वाचीभारतीय संघाला फायनल प्रवेशासाठी या गणितात व्हावे लागेल पास

India vs England, 1st Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून रजेवर गेलेला विराट कोहली ( Virat Kohli) पुन्हा एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोना संकटामुळे मायदेशात वर्षभर आंतरराष्ट्रीय मालिका झालेली नव्हती आणि भारत-इंग्लंड मालिकेतून भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचेही पुनरागमन होत आहे. त्यामुळे विराट अन् आंतरराष्ट्रीय क्रिकेट या दोघांचे दणक्यात स्वागत करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱा गाजवल्यानंतर टीम इंडियाचे शिलेदार काही दिवसांच्या विश्रांतीवर होते आणि त्यानंतर आता ते या मालिकेसाठी सज्ज आहेत. सोमवारपासून टीम इंडियाच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली. त्यात कर्णधार विराट 'शॅडो हेलिकॉप्टर' शॉट मारताना दिसला. यावरून तो कसोटी मालिकेत MS Dhoniच्या फटक्याची कॉपी करताना दिसेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ( ऑस्ट्रेलियाची माघार अन् न्यूझीलंडला मिळालं WTC फायनलचं तिकीट; टीम इंडियासाठी असं असेल गणित! ) 

५ फेब्रुवारीला दोन्ही संघांमध्ये मालिकेतील पहिला सामना सुरू होणार आहे. २०२०च्या सुरूवातीला ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आली होती आणि तीन सामन्यांची वन डे मालिका टीम इंडियानं २-१नं जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला आणि त्यानंतरची मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका रद्द करावी लागली होती.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून मायदेशात परतले आहेत, तर इंग्लंडनेही श्रीलंकेला त्यांच्याच घरी २-० असे पराभूत केले आहे. त्यामुळे दोन्ही संघ सकारात्मकतेनं एकमेकांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. ( टीम इंडियाला ICC Test Ranking मध्ये पुन्हा अव्वल स्थान पटकावण्याची संधी, पण... ) 

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत होतील आणि दुसऱ्या सामन्यात ५० टक्के प्रेक्षकांना स्टेडियमवर उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. उर्वरित दोन सामने अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर होतील. ( गॅबा कसोटी गाजवणारे पाच खेळाडू पहिल्या कसोटीच्या Playing XI मधून होऊ शकतात बाद! ) 

 

पहिल्या दोन कसोटींसाठीचा भारत व इंग्लंडचा संघ ( squad for the first two Test matches against England) 
भारत - रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर. अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर; नेट बॉलर : अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वारियर, के. गौतम आणि सौरभ कुमार; राखीव खेळाडू : के. एस. भरत (यष्टीरक्षक), शाहबाज नदीम, राहुल चाहर आणि अभिमन्यू ईश्वरन.   

इंग्लंड - जो रूट, मोईन अली, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, झॅक क्रॅवली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लिच, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, जेम्स ब्रॅसी, मेसोन क्रॅन, साकिद महमूद, मॅट पर्किसन, ऑली रॉबीन्सन, अमर विर्दी.

Web Title: IND vs ENG : Virat Kohli trying shadow Helicopter shot during the outdoor practice session, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.