T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारतावर 10 गडी राखून सहज विजय मिळवला. उपांत्य सामन्यात अतिशय खराब कामगिरी झाल्यानंतर आता रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडसमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य इंग्लंडने अवघ्या 16 षटकांत गाठले. या सामन्यानंतर टीम इंडियाला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर टीम इंडियासह कर्णधार रोहित शर्मावर भारतीय चांगलेच भडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, दिग्गजांचाही समावेश आहे. मात्र, सचिन तेंडुलकर टीम इंडियाची बाजू घेऊन पुढे आला आहे.
भारताचे माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि अजय जडेजा यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सेहवाग म्हणाला, आज रोहितवरचे प्रेशर स्पष्टपणे दिसत होते. तर जडेजा म्हणाला, टीम तयार करण्यासाठी कर्णधाराला संपूर्ण वर्षभर संघासोबत राहावे लागते. दोन्ही दिग्गज माजी खेळाडूंनी रोहित शर्माचे कान टोचल्यानंतर आता मास्टरब्लास्टर आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर टीम इंडियाच्या पाठिशी उभा राहिला आहे. सचिनने भारतीयांना आणि क्रिकेट चाहत्यांना तत्त्वज्ञान सांगत पराभव मान्य करता आला पाहिजे, असे म्हटलं आहे. कारण, जय आणि पराजय दोन्हीही आपल्याच हातात आहे, आणि हातात नाही, असे सचिनने ट्विट करुन म्हटले आहे.
नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे जीवनालाही. जर आपण आपल्या संघाचा विजय आपला म्हणून साजरा करतो, अगदी त्याचप्रमाणे आपल्या टीमचा पराभवही आपला म्हणून मान्य करु शकलो पाहिजे, असे मत सचिनने ट्विट करुन मांडले आहे. आयुष्यात दोघेही हातात हात घालूनच असतात, असे तत्त्वज्ञान सचिने मांडले आहे.
काय म्हणाला अजय जडेजा
क्रिकबझसोबत बोलताना अजेय जडेजा म्हणाला, 'मी एक गोष्ट बोलेल, जी टोचू शकते, रोहित शर्मा एकेल त्यालाही.. जर एखाद्या कर्नधाराला टीम तयार करायची असले, तर त्याला संपूर्ण वर्षभर संघासोबत रहावे लागते. संपूर्ण वर्षभरात रोहित शर्मा किती दौऱ्यांवर गेला. मी हे पराभवामुळे बोलत नाही, या पूर्वीही मी असे बोललो आहे. जेव्हा आपल्याला टीम तयार करायची आहे, तेव्हा आपण संघोसोबत नाही. कोचला टीम तयार करायची आहे, ते न्यूझीलंडला जात नाहीत. तर मग टीम कशी तयार होईल?
रोहितच्या डोळ्यात दिसले अश्रू
२००७नंतर भारतीय संघ यंदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करेल अशीच सर्वांना अपेक्षा होती, परंतु रोहित शर्मा अँड कंपनीला अपयश आले. २०१७मध्ये भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आली नव्हती. २०१३मध्ये भारताने अखेरची आयसीसी स्पर्धा जिंकली होती. या पराभवानंतर रोहितच्या डोळ्यांत अश्रू आलेले दिसले आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला धीर दिला.